Envi Eco-farm Goa: जर तुम्ही रोजच्या धावपळीच्या जीवनाला कंटाळला असाल आणि शांतता शोधत असाल, तर दक्षिण गोव्यातील दाबाळमधील 'एनव्ही इको फार्म'ला भेट द्या. इथे तुम्हाला केवळ शांत वातावरणच नाही, तर गोव्यातील ग्रामीण जीवनाची झलकही पाहायला मिळेल.
धारबांदोड्यातील दाबाळच्या घनदाट जंगलात लपलेले 'एनव्ही इको फार्म' हे ६० एकरमध्ये पसरलेले आहे. इथपर्यंतचा प्रवास तुम्हाला गोव्याच्या जुन्या ग्रामीण वातावरणाची आठवण करून देईल. इथे पारंपरिक ग्रामीण रचना आणि हिरवीगार वनराई सोबत कॉटेज, फार्मस्टे आणि वृक्षारोपणाचा अनुभव घेता येतो.येथे आल्यावर पाहुण्यांचे स्वागत पारंपरिक पेये आणि स्नॅक्स देऊन केले जाते. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीच्या कॉटेज किंवा फार्मस्टेमध्ये सामान ठेवता येते.
'एनव्ही इको फार्म'मध्ये हिरवाईने वेढलेली तीन उच्च दर्जाची लाकडी कॉटेज आहेत. इथे आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत, ज्यामुळे तुम्ही शहराच्या गर्दीपासून दूर आराम करू शकता. जुन्या पारंपरिक गोव्यातील घरात फार्म हाऊस स्टे उपलब्ध आहे. इथे एसी खोल्या आणि संलग्न बाथरूम आहेत, आणि शेअरिंग आधारावर दिले जाते.
फार्ममध्ये नदीजवळ एक अतिशय मनोरंजक ठिकाण आहे. हे ठिकाण सुंदररित्या लँडस्केप केलेले आहे आणि उंच सुपारीच्या झाडांनी वेढलेले आहे, ज्यामुळे सावली मिळते, तर थोडा प्रकाश आत येतो. इथे तुम्ही तलावाजवळ आराम करू शकता आणि नदीच्या खळखळत्या आवाजाचा आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाचा आनंद घेऊ शकतात.
फार्ममध्ये दोन सुंदर बागा आहेत. पहिली म्हणजे फुलपाखरांची बाग, जिथे फुलपाखरांना आकर्षित करणारी वनस्पती आहे. त्यामुळे इथे विविध रंगांची फुलपाखरे पाहायला मिळतात. दुसरी बाग म्हणजे नक्षत्र बाग, जी खूप आकर्षक आहे.
इथे तुमच्या राशीनुसार तुम्हाला उपयुक्त असणाऱ्या वनस्पती शोधता येतात. ६० एकर जागेत फिरताना तुम्हाला काजू, आंबा, नारळ, सुपारी, केळी, अननस आणि इतर अनेक प्रकारची झाडे पाहायला मिळतील.
या ठिकाणी येणार असाल तर मसाला शेतीचा मार्ग चुकवू नका इथे तुम्हाला विविध मसाल्यांची माहिती मिळेल. इथे मिरपूड, व्हॅनिला, जायफळ, लवंग, वेलची आणि हळद यांसारखे मसाले पिकवले जातात. काजूच्या हंगामात, इथे फेणी आणि उर्राकसारखी स्थानिक पेये तयार केली जातात.
'एनव्ही इको फार्म'मध्ये तुम्हाला स्थानिक लोकांनी तयार केलेले अस्सल गोवन पदार्थ चाखता येतात. भात, कडी, चिकन झकुती, तळलेले मासे यांसारखे स्थानिक पदार्थ इथे मिळतात. इथे वॉल क्लायंबिंग, रॅपलिंग, मंकी ब्रिज, जम्पिंग जॅक, बर्मा ब्रिज, झिप-लाइनिंग आणि ट्रेकिंगसारखे साहसी खेळही खेळता येतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.