Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: म्हादई रक्षणासाठी आता 'आरजी'ने उचलले 'हे' पाऊल

'पक्षाची ही राज्यभरातील 100 किमीची पदयात्रा भावी जलसुरक्षेसाठी आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Mahadayi Water Dispute म्हादई प्रश्नाबाबत जनजागृती करण्यासाठी आता रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टी (आरजीपी) सोमवारी सत्तरी येथून नऊ दिवसांची पदयात्रा सुरू करणार आहे. आरजीपी प्रमुख मनोज परब यांनी याविषयी बोलताना सांगितले की, 'पक्षाची ही राज्यभरातील 100 किमीची पदयात्रा भावी जलसुरक्षेसाठी आहे.

आमच्या या पदयात्रेचा 28 फेब्रुवारील समारोप होईल. म्हादईचे संरक्षण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे हे गोवावासियांना समजावून सांगण्यासाठीच आमचा हा मोर्चा असून यात आम्ही लोकांना नदीचे महत्त्व पटवून देणार आहोत.

“आम्ही आमचा म्हादई वाचवण्याचा संदेश आणि म्हादई बाबतचा जाहीरनामा घरोघरी समजावून सांगण्यासाठी ही पदयात्रा काढत आहोत. कर्नाटक सरकार म्हादईचे पाणी वळवण्यासाठी प्रकल्प उभारून त्याचा इतिहास आणि भूगोल बदलण्याचा विचार करत आहे, या दुष्टचक्राला आताच जर रोखले नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील" असेही ते म्हणाले.

या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही लोकांना म्हादई आणि तिच्या उपनद्यांच्या गोव्यात वाहणाऱ्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे रक्षण करण्यासाठी आमच्यात सामील होण्यास सांगणार आहोत. तसेच म्हादईप्रश्नी गोवा सरकार कर्नाटकला रोखण्यात अयशस्वी ठरलंय.

त्यासाठी मोर्चाच्या माध्यमातून आम्ही लोकांना एकत्र करीत आहोत जेणेकरून सरकारवर दबाव निर्माण होऊन राज्याच्या हिताचे रक्षण करणारे निर्णय सरकारला घ्यावे लागतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: लहान मुलांना वाचविण्यासाठी जर्मन शेफर्डने बाल्कनीतून घेतली उडी; पाहा व्हिडिओ

Virat Kohli Debut: रन मशीन, चेस मास्टर... आजच्याच दिवशी क्रिकेट विश्वाला मिळाला 'किंग', 17 वर्षांच्या प्रवासातील विराटचे 3 'सुवर्ण क्षण'

Budget Friendly India Tour: दिल्ली, गोवा, जयपूर...14 दिवसांत भारत दर्शन; कसा कराल बजेटफ्रेन्डली प्रवास? वाचा प्लॅन

Viral Video: "असले मित्र नको रे बाबा!" धोकादायक मस्करीचा व्हिडिओ व्हायरल; त्याची 'ही' अवस्था पाहून नेटकरी संतप्त

Operation Sindoor: पाकिस्तानच्या ‘पळपुट्या' नौदलाची पोलखोल! ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान नौका ग्वादर बंदरात लपवल्या; सॅटेलाईट फोटोंमधून खुलासा

SCROLL FOR NEXT