Fire in Goa Forests Dainik Gomantak
गोवा

Fire in Goa: फोंडा तालुक्‍यातही अग्‍नितांडव; बेतोडा, उसगाव डोंगर पेटले

आगीच्या कारणांवरून उलटसुलट प्रतिक्रिया

Akshay Nirmale

Fire in Goa Forest: राज्यात सगळीकडे आगीचे लोण पसरत असतानाच फोंडा तालुक्यालाही आगीच्या घटनांनी ग्रासले आहे. फोंडा तालुक्यातील बेतोडा, उसगाव आदी भागातील डोंगरांना आग लागण्याचे प्रकार घडत असून, ही आग लागते की लावली जाते यावर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

काल बेतोडा भागातील डोंगरांना मोठी आग लागल्यानंतर अग्निशामक दल तसेच स्थानिकांनी ही आग आटोक्यात आणण्‍यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. कल्लपवाडा-उसगावातील डोंगराळ भागालाही अचानक आग लागल्याने लोकांची धावपळ उडाली.

आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला दिल्यानंतर दलाच्या जवानांनी आग विझवली; तरीही अनेक ठिकाणी आग धुमसत होती. ही आग स्थानिकांनी आटोक्यात आणली.

दरम्यान, अनमोड घाटातही आग भडकली असून आगीवर नियंत्रणासाठी फोंडा तसेच कुडचडे अग्निशामक दलाच्या बंबांना पाचारण करण्‍यात आले आहे. मोठ्या प्रयत्‍नांती आग आटोक्यात आली.

सारझोरा येथे धोका कायम

नावेलीनंतर याच डोंगर कप्प्याच्या टेकडीतील सारझोरा येथील डोंगर कड्याने पेट घेतला. बुधवारी मध्यरात्री 2 वाजता ही आग विझविण्यात आली. वाऱ्यामुळे ही आग पुन्हा केव्हाही फैलावण्याची शक्यता असल्याचे मडगाव अग्निशमन दलाचे अधिकारी गिल सौझा यांनी सांगितले.

ही आग पहिल्या वेळी नियंत्रणात आणण्यात आली होती. यानंतर मंगळवारी पुन्हा ही आग भडकली. या डोंगर कड्यावर आग लागण्याचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT