Goa Police Arrests Notorious Drug Pedler:  Dainik Gomantak
गोवा

Goa Police News: कुख्यात ड्रग पेडलर प्रसाद वाळके याला अटक; 4.20 लाखांचे अमली पदार्थ जप्त

गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Police Arrests Notorious Drug Peddler: गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (ANC) कुख्यात अंमली पदार्थ विक्रेता प्रसाद वाळके याला अटक केली. आसगाव, बार्देश येथे ही कारवाई करण्यात आली आहे. वाळके याच्याकडून हायड्रोपोनिक वीड, एमडीएमए आणि एक्स्टसी पावडर असे एकूण 4 लाख 20 हजाराचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

2018 मध्ये वाळके याला एनसीबी गोवा युनिटने एलएसडी, कोकेन, एक्स्टसी आणि गांजा यांसारख्या प्रतिबंधित वस्तू बाळगल्याबद्दल अटक केली होती.

त्यानंतर 2021 मध्ये अभिनेता सुशांत सिंग रजपूतच्या मृत्यूच्या पाठपुराव्याच्या तपासादरम्यान, एनसीबीने व्यावसायिक प्रमाणात एलएसडी ब्लॉट्स ठेवल्याबद्दल वाळके याला पुन्हा अटक केली होती.

वाळके हा एएनसीच्या रडारवर होता. विश्वसनीय माहितीच्या आधारे पाळत ठेऊन एनएनसी अधिकाऱ्यांनी सापळा रचत त्याला रंगेहाथ आसगाव येथून अटक केली. तिथे तो ड्रग्जचा सौदा करण्यासाठी आला होता.

LPSI प्रियंका गारोडी यांनी एएनसीचे पोलिस निरीक्षक सजीथ पिल्लई यांच्या देखरेखीखाली पीसीएस नितेश मुळगावकर, मंदार नाईक, सुमित मुटकेकर, साईराज नाईक, संदेश वोल्वोईकर, पीसी ड्रायव्हर कुंदन पाटेकर यांनी छापा टाकला. याप्रकरणी अधिक तपास पीएसआय प्रवीण सिमेपुरुषकर करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

Navelim: नावेली पंचायतीतील 2 पंच पोर्तुगीज, तक्रारीमुळे अपात्रतेचे संकट; सरपंच निवडणूक लांबणीवर

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

Goa Politics: केजरीवालांच्‍या ‘एकला चलो’चा गोव्‍यावर परिणाम? राजकीय वर्तुळात चर्चा; युतीशिवाय पर्याय नसल्याचे विरोधकांचे मत

SCROLL FOR NEXT