Notice Dainik Gomantak
गोवा

Anjuna News : हणजूण पंचायतीच्या 175 बांधकामांना नोटिसा

कागदपत्रे सादर करण्यास नोटीसीद्वारे कळविण्यात आले

दैनिक गोमन्तक डिजिटल

हणजूण-कायसूव पंचायतीने तटीय नियमन क्षेत्र तथा अविकसित क्षेत्रातील तब्बल 175 बांधकामांच्या मालकांसह रहिवाशांना सार्वजनिक नोटीस जारी केल्या आहेत.

नोटीसीद्वारे संबंधितांना बांधकाम परवाना किंवा परवानगी यासारखी कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. गोवा पंचायत राज्य कायद्याच्या कलम ६६ नुसार पंचायतीने सदर संरचनांची कायदेशीरता निश्चित केली असल्यास परवाना सादर करण्यास सांगितले आहे.

ही कागदपत्रे पाच दिवसांत पंचायतीकडे जमा करायची आहेत. २६ एप्रिल २०२३ रोजीच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही सार्वजनिक सूचना जारी केली आहे.

संबंधित रहिवासी, मालक ज्यांची बांधकामे, कॉटेज, रेस्टॉरंट आहेत त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून पाच दिवसांच्या आत हणजूण-कायसूव ग्रामपंचायतसमोर बांधकाम परवाना सादर करण्याचे आवाहन नोटीसीद्वारे करण्यात आले आहे.

दरम्यान, कागदपत्रे सादर न केल्यास पंचायत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गोवा पंचायत राज कायद्यांतर्गत योग्य ती कारवाई करेल, असेही या नोटिशीमध्ये नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT