Destero flyover  Dainik Gomantak
गोवा

'बायणा- देस्तेरो उड्डाणपुलाचा पर्यटनस्थळ म्हणून उपयोग करू नका'

महामार्ग प्राधिकरण: वाहन पार्क करणे, पुलावर थांबणे, चालणे चुकीचे

दैनिक गोमन्तक

वास्को: वेर्णा ते मुरगाव बंदरपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गातील वास्को गांधीनगर ते बायणा- देस्तेरो उड्डाणपुलाचे उद्‍घाटन झाल्याने, येथे अवजड वाहनांबरोबर इतर वाहनांची वर्दळ सुरू झाली आहे. मात्र गांधीनगर ते बायणा- देस्तेरो राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलावर वाहन चालक वाहने पार्क करतात, नागरिक उभे राहतात, चालतात हे एकदम चुकीचे आहे,असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कळवले आहे.

याविषयी गांधीनगर व देस्तेरो येथे दोन्ही विभागात तर्फे सूचनाफलक लावले असून या उड्डाणपुलाचा पर्यटनस्थळ म्हणून जनतेने उपयोग करू नये, असे आवाहन विभागाने केले आहे. सदर उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत येत असल्याने पादचाऱ्यांना अपघात झाल्यास पादचारीच दोषी ठरेल, असेही दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना तर्फे सांगण्यात आले आहे.

मुरगाव बंदरापर्यंत जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांबरोबर इतर वाहनांना वास्को गांधीनगर ते बायणा देस्तेरो सडापर्यंत वाहतुकीस मुभा देण्यात आल्याने, वास्को शहरातील काही प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ कमी झाली आहे. वास्को गांधीनगर ते मुरगाव सडा पर्यंत राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. सदर वास्को गांधीनगर ते बायणा देस्तेरो पर्यंत राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाचे लोकार्पण झाल्यानंतर नागरिकांनी या उड्डाणपुलाचा पर्यटनस्थळ समजून वापर सुरू केल्याने एका प्रकारे राष्ट्रीय महामार्गाचा दुरुपयोग होत असल्याचे संबंधित विभागाच्या निदर्शनास आले.

त्यानंतर त्यांनी वास्को गांधीनगर व देस्तेरो येथे उड्डाणपुलावर वाहने पार्क करण्यास तसेच नागरिकांना उड्डाणपुलावर चालण्यास वा थांबण्यास मनाई केली आहे, अशा आशयाचे फलक लावले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने व राज्य सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन आठवड्यांपूर्वी संयुक्तरित्या संपूर्ण महामार्गाची पाहणी करून हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती दोन्ही विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

वेर्णा पासून मुरगाव बंदरापर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांनी वाहने पार्क करणे, हा सुद्धा गुन्हा असल्याची माहिती दोन्ही अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुरगाव पोलिसांतर्फे उड्डाणपुलावर वाहने पार्क करणाऱ्या वाहन चालकांना दंड ठोठावला जातो. मात्र तरीही अनेक नागरिक उड्डाणपूल हे पर्यटनस्थळ समजून वावरत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT