North Goa Dainik Gomantak
गोवा

North Goa : उत्तर गोव्यात सत्तरी, डिचोली, पेडणेच भाजपला देणार भरभक्कम आघाडी

North Goa : ‘अंडर करंट’ कोणत्याही परिस्थितीत अस्तित्वात नसल्याचा दावा

गोमन्तक डिजिटल टीम

North Goa :

पणजी, उत्तर गोव्यात सत्ताधारी पक्षाच्या विरोधात, विशेषत: श्रीपाद नाईक यांच्याविरोधात एक जबरदस्त ‘अंडर करंट’ असल्याचा अंदाज काही राजकीय पंडित व्यक्त करीत आहेत.

परंतु भाजपच्या अभ्यासकांनी त्यांचा हा दावा खोडून काढताना सत्तरी, डिचोली, पेडणे व बार्देशमधील मतदान पक्षाला ८५ हजारांचे मताधिक्य देणार असल्याचा दावा केला आहे.

कॉंग्रेस पक्षाचे समर्थक निरीक्षक तिसवाडी, बार्देस येथे कॉंग्रेस पक्षाच्या बाजूने मतदान झाले असल्याचे व बऱ्याच भागात भाजपमधील अंतर्गत धुसफूस मतदानावर परिणाम करणार असल्याचे सांगत आहेत. विशेषत: सांतआंद्रे, कुंभारजुवे व सांताक्रुझ मतदारसंघ तसेच कळंगुट, हळदोणे या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपची पीछेहाट होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

भाजपचे अभ्यासक सांगतात की, लोकसभा निवडणुकीत सत्तरी तालुक्यात ८८ टक्के मतदान झाले आहे. तेथे ३० हजारांची स्पष्ट आघाडी भाजपला मिळणार आहे. डिचोली तालुक्यात विधानसभा निवडणुकीत ज्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती, तेच केवळ यावेळी कॉंग्रेस उमेदवारासोबत होते.

त्यामुळे या तालुक्यातील दोन्ही मतदारसंघांत भाजपला २५ हजारांची आघाडी भाजपने अपेक्षिलेली आहे. साखळीत ८७ टक्के मतदान झाले असून तेथे ८ ते १० हजारांची आघाडी भाजपने अपेक्षित धरली आहे. साखळीत कॉंग्रेसला केवळ एक जाहीर सभा घेता आली.

भाजपचे अभ्यासक सांगतात की, लोकसभा निवडणुकीत सत्तरी तालुक्यात ८८ टक्के मतदान झाले आहे. तेथे ३० हजारांची स्पष्ट आघाडी भाजपला मिळणार आहे. डिचोली तालुक्यात विधानसभा निवडणुकीत ज्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती, तेच केवळ यावेळी कॉंग्रेस उमेदवारासोबत होते. त्यामुळे या तालुक्यातील दोन्ही मतदारसंघांत भाजपला २५ हजारांची आघाडी भाजपने अपेक्षिलेली आहे. साखळीत ८७ टक्के मतदान झाले असून तेथे ८ ते १० हजारांची आघाडी भाजपने अपेक्षित धरली आहे. साखळीत कॉंग्रेसला केवळ एक जाहीर सभा घेता आली.

बार्देश तालुक्यातील कळंगुट, हळदोणे येथे भाजपला अडचणींना सामोरे जावे लागेल, हे निरीक्षकांना मान्य आहे. बार्देशमधील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये ७० टक्के मतदान झाले आहे. परंतु म्हापसा, पर्वरीसह पाच मतदारसंघांमध्ये मिळून भाजपला १५ हजारांची आघाडी प्राप्त होईल, असा विश्‍वास सत्ताधारी नेत्यांना आहे. त्यामुुळे श्रीपाद नाईक यांचे मताधिक्य ८० हजारांवर जाईल.

तिसवाडी तालुक्यात पणजी व ताळगाव या मतदारसंघांत भाजपला प्रत्येकी दोन हजारांची आघाडी मिळेल, त्यामुळे श्रीपाद नाईकांचे मताधिक्य ८५ हजारांच्या पुढे जाईल. भाजपच्या अभ्यासकांच्या मते उत्तर गोव्यातील ही परिस्थिती पाहता त्यांचा उमेदवार ८५ हजार ते एक लाख मतांनी विजयी होऊ शकतो. दुसऱ्या बाजूला विरोधकांच्या मते ‘अंडर करंट’ जबरदस्त असून अनेक खात्रिशीर समाज भाजपपासून दूर झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward AAP Alliance: भाजप-काँग्रेसला पर्याय म्हणून 'गोवा फर्स्ट' मैदानात! सरदेसाई-केजरीवालांची आघाडी जाहीर; 2027च्या निवडणुकीसाठी नवे राजकीय समीकरण

अलेक्झांडर ज्वेरेव्हने रचला इतिहास! बेन शेल्टनला धूळ चारत जिंकले 'US Open 2026' चे विजेतेपद; बनला नवा चॅम्पियन

खरी कुजबुज: गणपती कोणाला पावणार?

Iran Missile Attack: अमेरिकन सैनिकांवरील हल्ल्यात चीनचा हात? गुप्तचर सॅटेलाईट फोटोंचा नवा खुलासा, ट्रम्प सरकारची वाढली डोकेदुखी

Goa Water Conservation: गोव्यात पाण्याची मोठी चिंता! 30 सप्टेंबरपर्यंत 500 बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा सरकारचा निर्णय; जलसंवर्धनासाठी उचलली पावले

SCROLL FOR NEXT