Court  Canva
गोवा

Arambol Panchayat: हरमल पंचसदस्याची अपात्रता न्यायालयाकडून कायम; फर्नांडिस पुरावा देण्यास असमर्थ

Arambol: हरमल पंचायत सदस्य फर्नांडिस यांना पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याचा आदेश उत्तर गोवा प्रधान जिल्हा न्यायालय पणजी यांनी कायम ठेवला

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: गिरकरवाडा, हरमल येथील बेकायदा बांधकामांना जबाबदार धरण्यात आल्याने हरमल पंचायत सदस्य बर्नार्ड फर्नांडिस यांना पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याचा पंचायत संचालनालयाने दिलेला आदेश उत्तर गोवा प्रधान जिल्हा न्यायालय, पणजी यांनी कामय ठेवला आहे.

फर्नांडिस यांनी उत्तर गोवा प्रधान जिल्हा न्यायालयासमोर दिवाणी पुनरीक्षण अर्ज दाखल करून पुढील पाच वर्षांसाठी पंचायत निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवणाऱ्या पंचायत संचालकांच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी केली होती.

फर्नांडिस हे हरमल गावचे सरपंच होते आणि प्रभाग क्रमांक ४(गिरकरवाडा)मधून पंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते. जिथे ‘नो-डेव्हलपमेंट झोन’ (एनडीझेड)मध्ये सुमारे १८७ संरचना समोर आल्या होत्या. त्यापैकी जवळपास ६१ बांधकामे कोणताही बांधकाम परवाना, परवानगी आणि भोगवाटा प्रमाणपत्राशिवाय अस्तित्वात असल्याचे आढळून आले.

६१पैकी ३३ संरचनेचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करण्यात आला. फर्नांडिस यांनी सुरवातीला सरपंचपदाचा राजीनामा दिली होता. मात्र, त्यांनी राजीनामा मागे घेतला. त्यानंतर पंचायत संचालकांनी त्यांना पदावरून हटवले. फर्नांडिस यांच्या पचंयात सदस्याच्या कार्यकाळात १८७ (कमी नाही) बेकायदा बांधकामे उभारण्यात आली.

गोवा खंडपीठाने दिलेले निर्देश पाहता, पंचायत संचालकांनी फर्नांडिस यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यांनी उत्तरात म्हटले की, बेकायदेशीर बांधकामांची ओळख पटवणारा पंचायतीचा अहवाल चुकीचा आहे. तो पंचायत संचालनालयाने विचारात घेऊ नये. फर्नांडिस यांनी अहवालात दाखविलेल्या ३३ पैकी २८ संरचना त्यांच्या मालकीच्या नसल्याचे सांगत अहवालाला आव्हान दिले.

पुरावा सादर केला नाही

१९९१च्या सीआरझेड अधिसूचनेपूर्वी त्यांच्या वडिलांनी बहुतेक बांधकाम केले होते आणि काही हरमल ग्रामपंचायत अस्तित्वात येण्यापूर्वीच बांधल्या गेल्या होत्या, असेही म्हणणे सादर केले. सर्वेक्षणाच्या आराखड्यात सदर रचना दाखविण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. परंतु, फर्नांडिस हे बांधकामांची कायदेशीरता दर्शविणारा एकही कागदोपत्री पुरावा सादर करू शकले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs ENG: पहिल्याच सामन्यात गरमागरमी, लाबुशेन-कार्स मैदानावर भिडले; बाचाबाचीचा व्हिडिओ तूफान व्हायरल

Earthquake in BAN vs IRE 2nd Test: बॉलिंग-बॅटिंग सोडून 'पळापळ'! भूकंपानं मैदान हादरलं, खेळाडूंंमध्ये भीतीचं वातावरण

Pakistan Factory Blast: पाकिस्तानात फॅक्टरीत भीषण स्फोट, 15 ठार, 7 जखमी; फॅक्टरीचा मालक फरार, मॅनेजरला अटक VIDEO

VIDEO: ना भरजरी साडी ना मेकअप! साऊथची 'ब्युटी क्वीन' साई पल्लवीचा 'IFFI' मध्येही पारंपरिक लूक, अभिनेत्रीच्या सौंदर्याची होतेय चर्चा

Goa Cable Issue: ..अखेर मार्ग मोकळा! वीज खांबांवरील केबल्स कापल्या जाणार; गोवा खंडपीठाचा स्थगितीस नकार

SCROLL FOR NEXT