Police Canva
गोवा

Goa Police: तब्बल ६०० जणांविरुद्ध कारवाई; उत्तर गोवा पोलिसांची धडक मोहीम

North Goa Police Action: धुम्रपान, भाडेकरू पडताळणी तसेच मोटार वाहन नियम उल्लंघन केलेल्यांचा समावेश

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात सध्या चोरीची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत असल्याने उत्तर गोव्यात अकस्मात रात्रीची पोलिस गस्त तसेच नाकाबंदी सुरू करण्यात येत आहेत. या गस्तीमुळे रात्रीच्यावेळी संशयास्पदरित्या फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याची धडक मोहीम सुरू झाली आहे.

उत्तर गोवा पोलिसांनी काल रात्री गस्तीवेळी सुमारे ६०० जणांविरोधात कारवाई केली. यामध्ये अधिक तर धुम्रपान, भाडेकरू पडताळणी तसेच मोटार वाहन नियम उल्लंघन केलेल्यांचा समावेश आहे, अशी माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली आहे.

पोलिस अधीक्षक कौशल हे स्वतः रात्रीच्या गस्तीवर फिरत असल्याने स्थानकातील पोलिस कर्मचारीही अधिक सक्रीय झाला आहे. ड्युटीवर असताना पोलिसांनी अधिकार क्षेत्राच्या बाहेर न जाण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे त्यांनी पोलिसांमध्ये शिस्त आणण्याचा सपाटा लावला आहे. रात्रीच्यावेळी रस्त्यावर उशिरापर्यंत कामाव्यतिरिक्त फिरणाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे.

काल रात्री विविध पोलिस स्थानकांच्या पोलिसांनी सार्वजनिक क्षेत्रात धुम्रपान व थंकणे याच्या २११ प्रकरणे नोंद केली आहे. त्याच्या पाठोपाठ गुटखा विक्री व खाणे तसेच दुकानात साठा करून ठेवल्याप्रकरणी १७९ जणांविरुद्ध कारवाई केली आहे. बसस्थानकावरील बेकायदेशीर दलाल, कचरासंदर्भात केलेले उल्लंघनप्रकरणी अनुक्रमे ७ व ६६ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

या गस्तीवेळी महामार्गावरील काही वाहन चालकांची मद्य चाचणी तसेच इतर मोटार वाहन नियम उल्लंघनप्रकरणी कारवाई केली गेली त्याची संख्या १४९ आहे.

कामचुकार पोलिसांना चपराक

राज्यात रात्रीच्यावेळी देवस्थानमधील फंडपेटी तसेच बंद असलेले फ्लॅट हेरून चोऱ्यांचे प्रकार अधिक वाढले आहेत. फोंडा या शहरात एकाच रात्री दहा दुकाने चोरट्यांनी तोडली होती.

या घटनेमुळे पोलिसांनी रात्रीच्यावेळी गस्त घालण्याची धडक मोहीम सुरू केली आहे. स्वतः पोलिस अधीक्षकच या मोहिमेचे नेतृत्व करत असून वेळोवेळी ते आपल्या अधिकाऱ्यांकडून ते माहिती घेत आहेत.

रात्रीच्यावेळी पोलिसांची असलेल्या उपस्थितीमुळे काही बेकायदेशीर कारवायांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न अधीक्षक कौशल यांनी चालविला आहे.

त्यांच्या या मोहिमेमुळे कामचुकार पोलिसांना चांगली चपराक बसली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT