North Goa Final Voter List Dainik Gomantak
गोवा

North Goa Final Voter List: उत्तर गोव्याची अंतिम मतदारयादी 4 जानेवारीला; वगळलेली नावे पुन्हा समाविष्ट करण्याची संधी

North Goa final voter list 2027: उत्तर गोव्‍यातील ‘एसआयआर’ची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन ४ जानेवारी २०२७ रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्‍यात येणार आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: उत्तर गोव्‍यातील ‘एसआयआर’ची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन ४ जानेवारी २०२७ रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्‍यात येणार आहे. यादरम्‍यान एक महिना मतदारयादीत विशेष संक्षिप्‍त सुधारणा (एसएसआर) करण्‍यात येणार असून, ज्‍यांची नावे मतदारयाद्यांतून वगळण्‍यात आलेली आहेत, अशांना या कालावधीत पुन्‍हा दावे तसेच आक्षेप सादर करण्‍याची संधी मिळणार आहे. उत्तर गोवा जिल्‍हाधिकारी सुरेंद्र नाईक यांनी परिपत्रक जारी केले आहे.

भारतीय निवडणूक आयोगाने उत्तर गोव्‍यासाठीच्‍या ‘एसएसआर’ प्रक्रियेचे वेळापत्रक जारी केले आहे. त्‍यानुसार येत्‍या २ नोव्‍हेंबरपर्यंत उत्तर गोव्‍यातील मतदान केंद्रांची पुनर्रचना करण्‍यात येईल. १२ रोजी मतदारयाद्यांचा मसुदा प्रसिद्ध केला जाईल. तर, १२ नोव्‍हेंबर ते ११ डिसेंबर या कालावधीत मतदारयाद्यांची संक्षिप्‍त उजळणी करण्‍याची प्रक्रिया सुरू होणार असून, या काळात मतदारयाद्यांतून नावे वगळलेल्‍यांना दावे सादर करता येतील. नवमतदारांना नावांचा समावेश करण्‍याची संधी मिळेल. २८ नोव्‍हेंबर रोजी दावे आणि आक्षेप निकाली काढून ४ जानेवारी रोजी उत्तर गोव्‍याची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाईल.

मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे

नोंदणी आणि दावे सादर करण्‍याची प्रक्रिया आणखी सुलभ करण्‍यासाठी ‘एसएसआर’च्‍या कालावधीत मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे तोपर्यंत दावे सादर न केलेल्‍या तसेच नव्‍याने नोंदणी करण्‍यासाठी जाणाऱ्या नवमतदारांना फायदा मिळेल.

Bhuvneshwar Kumar World Record: भुवनेश्वर कुमारचं टीम इंडियात कमबॅक! तब्बल 1,430 दिवसांनंतर केली गोलंदाजी, पहिल्याच 2 चेंडूंवर नोंदवला विश्वविक्रम

Goa Under 23 Cricket: दिशांक मिस्कीनची एकाकी झुंज! नाबाद 97 धावांसह गोव्याला बिहारविरुद्ध विजयाची संधी

Ranji Trophy: 40 पैकी 38 विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या; गोव्याच्या फलंदाजांची रणजीत दयनीय अवस्था

Asian Para Games 2026: भारताच्या गोल्डन गर्लची कमाल! शीतल देवीने अवघ्या काही तासांत जिंकली दोन सुवर्णपदके; एशियन पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

DA Hike Update: दिवाळीपूर्वी महागाई भत्ता वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होऊ शकते वाढ; मंत्रिमंडळाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

SCROLL FOR NEXT