Cuchelim Illegal House Demolition Dainik Gomantak
गोवा

Cuchelim: कुचेलीतील बेकायदा बांधकामांना नोटिसा! उत्तर देण्यासाठी 15 दिवसांची मुदत

Cuchelim Encroachment: उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासक पांडुरंग गाड यांनी खडपावाडा, कुचेली कोमुनिदादच्या १.४३ चौरस मीटर जमिनीवरील बेकायदा बांधकाम करणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Cuchelim Illegal House Notice

म्हापसा: उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासक पांडुरंग गाड यांनी खडपावाडा, कुचेली कोमुनिदादच्या १.४३ चौरस मीटर जमिनीवरील बेकायदा बांधकाम करणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सूत्रांनी माहिती दिली कीत, दफनभूमीसाठी संपादित केलेल्या जमिनीसह संपूर्ण कोमुनिदाद जमिनीवर अशी सुमारे १४० बांधकामे बांधण्यात आली आहेत.

या अनुषंगाने पीटी शीट क्र. १मधील चलता क्र. १०/३ मधील ५३,३२५ चौ.मीटर जागेत तसेच पीटी शीट क्र. २च्या चलता क्र. ११/१च्या ९०,८०० चौ.मीटर जमिनीवर बेकायदा बांधकाम करुन उल्लंघन केल्याचे म्हटले आहे. त्यानुसार, कोमुनिदादच्या उत्तर विभागाचे प्रशासक पांडुरंग गाडा यांनी सर्व रहिवाशांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यानुसार,

संबंधितांवर कारवाई का करु नये, याचे उत्तर १५ दिवसंत द्यावे. संबंधितांनी अतिक्रमण करुन या जागेत घरे बांधली आहेत.

गाड पुढे म्हणाले की, जर दिलेल्या मुदतीत उत्तर देऊ शकला नाही, तर प्रकरण एकतर्फी ठरवले जाईल. दरम्यान, गेल्या आठवड्यात

सरकारने स्मशानभूमीच्या उद्देशाने संपादित केलेल्या कुचेली कोमुनिदाद जमिनीवर बांधलेल्या सुमारे ३२ बेकायदेशीर बांधकामे पाडण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: CM पदाच्या शर्यतीत भंडारींपैकी कोणाचेच नाव नाही! रवी नाईकांनंतर भंडारी समाजात 'मॅग्नेटिक' नेत्याचा दुष्काळ; 2027 च्या निवडणुकीत कुणाचे भवितव्य पणाला?

Goa Politics: मुख्यमंत्र्यांनी गोवा विकायला काढला? काँग्रेसच्या 'राखण यात्रे'तून प्रमोद सावंतांवर थेट हल्लाबोल; साखळीचा 'सिकंदर' कोण? 

Goa ST Political Reservation: 'आता फसवणूक सहन करणार नाही!' 2027 च्या निवडणुकीपूर्वी एसटी समाजाला आरक्षण द्या; गोव्यात आंदोलनाचा एल्गार

Mhadei Water Dispute: केंद्राला पत्र पुरे, कोर्टाकडून पाहणीचा आदेश मिळवा! म्हादईचा लढा निर्णायक वळणावर; संयुक्त पाहणीसाठी गोव्याचा मोठा डाव

खरी कुजबुज: ...अन् त्‍यांच्‍या काळजात धस्स!

SCROLL FOR NEXT