North Goa Collector Office, Panjim Dainik Gomantak
गोवा

Goa Bomb Threat: भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळाली बॉम्बची धमकी; पोलिस हाय अलर्टवर

North Goa Collector Panaji Receives Bomb Threat: मेल समोर आल्यानंतर तात्काळ याची दखल घेत घटनास्थळी पोलिस तसेच, बॉम्ब शोधक व निकामी करणारे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Pramod Yadav

पणजी: भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, देशातील सर्व राज्य अलर्ट मोडवर आहेत. दोन्ही देशात हल्ला प्रतिहल्ला सुरु असताना सर्वांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, गोव्यातील उत्तर जिल्हाधिकारी कार्यालयाला आज (शुक्रवारी) दुपारी बॉम्बची धमकी मिळाली असून, पोलिस आणि बॉम्ब शोधक व निकामी करणारे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी पणजीत असणाऱ्या उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. याबाबतचा एक कार्यालयाच्या अधिकृत मेलवर शुक्रवारी दुपारी प्राप्त झाला. ३.३० पर्यंत कार्यालय खाली करा अन्यथा ब्लास्ट होणार, अशी धमकी या ई-मेलच्या माध्यमातून देण्यात आली. मेल समोर आल्यानंतर तात्काळ याची दखल घेत घटनास्थळी पोलिस तसेच, बॉम्ब शोधक व निकामी करणारे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातून सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले असून, बॉम्ब शोधक पथक कार्यालयात बॉम्बचा शोध घेत आहे. तसेच, पोलिसांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. पोलिस मिळालेल्या ई-मेलची देखील पडताळणी करत आहेत. दरम्यान, यापूर्वी देखील गोव्यात अशाप्रकारे बॉम्बची धमकी देणारे बॉम्ब प्राप्त झाले आहेत. गोवा पोलिस मुख्यालय, मुंबई उच्च न्यायालयाचे गोवा खंडपीठ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी यापूर्वी मिळाली होती. दरम्यान, चौकशीअंती हा ई-मेल खोटा असल्याचे समोर आले होते.

भारत आणि पाकिस्तान यांच्या गेल्या चार दिवसांपासून तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळत आला. भारताने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेला पाकिस्तान भारताच्या विविध ठिकाणांवर हल्ले करत आहे. अशात देशातील सर्व राज्यांना सतर्कते राहण्याचा इशारा देण्यात आला. विशेषत: सीमा भागातील राज्य आणि किनारी भागातील राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गोव्यातील मिळालेल्या बॉम्बचा धमकीचा सध्या पोलिस आणि बॉम्ब शोधक पथक तपास करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT