Goa Crime Margao Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: नुरानी दरोडा - संशयिताला तब्बल 20 वर्षांनंतर अटक

मडगाव येथे दिवसाढवळ्या हा धाडसी दरोडा घातला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Crime in Margao Goa: मडगाव येथे 2002 साली ताजुद्दिन नुरानी यांच्या घरावर घातलेल्या दरोड्यानंतर फरार झालेल्या हबीब अहमद (59) याला मडगाव पोलिसांनी तब्बल 20 वर्षांनंतर बिजनोर-उत्तर प्रदेश येथे अटक करून गोव्यात आणले.

मडगाव येथे दिवसाढवळ्या हा धाडसी दरोडा घातला होता. घटनेच्या बऱ्याच कालावधीनंतर मडगाव पोलिसांनी सात जणांना अटक केली होती.

मात्र, संशयित पोलिसांच्या हाती लागला नव्हता, तो उत्तर प्रदेशमध्ये राहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्याला तिथे जाऊन ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मडगाव येथील पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांनी दिली.

या दरोडा प्रकरणातील इतर आरोपींना न्यायायलाने यापूर्वीच शिक्षा ठोठावली आहे. आता या संशयिताविरोधातही सुनावणी चालू होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

SCROLL FOR NEXT