Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थानिकांना डावलून परप्रांतीयांना रोजगार, उदय महालेंचा आंदोलनाचा इशारा

Mopa Airport Goa: याबाबत लवकरच पत्रकार परिषद घेऊन पुढील रणनीती जाहीर करणार आहे, असे उदय महाले यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी: मनोहर आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळावरील धावपट्टी स्वच्छ करण्याच्या उद्देशाने खरेदी केलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त वाहनावर चालक म्हणून स्थानिकांना डावलून गोव्याबाहेरील व्यक्तींची भरती केल्याने स्थानिकांवर अन्याय झाला आहे.

या विरोधात कासारवर्णे ग्रामपंचायतीसमोर धरणे, आंदोलन करणाचा इशारा मोपा पीडित जन संघटनेचे निमंत्रक उदय महाले यांनी दिला आहे.

याबाबत संबंधित पाच पंचायतींना निवेदन देण्यात आले आहे. स्थानिकांना डावलून गोव्या बाहेरील युवकांन वाहन चालक म्हणून पेडणेतील मनोहर आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळावर नोकरीत सामावून घेतल्याबद्दल मोपा पिडीत जन संघटनेचे उदय महाले यांनी १७ रोजी मोपा विमानतळ परिसरातील पेडणे मतदारसंघातील कासारवर्णे, चांदेल-हसापूर, वारखंड-नागझर, खाजने - अमेरे - पोरस्कडे व तांबोसे - उगवे - मोप या पाच ग्रामपंचायतींना लेखी निवेदन सादर करून याबाबत योग्य कारवाई करून समाधानकारक निर्णय घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसे न केल्यास पुढील सात दिवसांत पेडणे मतदारसंघातील कासारवर्णे ग्राम पंचायत कार्यालयासमोर कार्यालयीन वेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे,. असा इशारा दिला आहे.

उदय महाले म्हणाले, पेडणेतील मनोहर आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळासाठी कवडीमोल किमतीत जमीन दिलेल्यांवर राज्य सरकारकडून आतापर्यंत अन्याय करण्यात आला असून त्यांना न्याय मिळवून देण्याऐवजी मोपा विमानतळावर स्थानिकांनाच रोजगार, व्यवसाय उपलब्ध करून दिल्याची घोषणा केली जाते, पण प्रत्यक्षात पेडणेवासीयांवर अन्यायच होत आहे.

...लवकरच रणनीती!

स्थानिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवून स्थानिकांना समाधानकारक न्याय मिळवून देण्यासाठी पेडणेतील ग्रामपंचायत पातळीवरील सरपंच, उपसरपंच व पंच सदस्य तसेच सामाजिक संघटनांनी, विविध राजकीय नेत्यांनी धरणे आंदोलनात सहभागी व्हावे, सर्वांनी सहकार्य करावे.

याबाबत लवकरच पत्रकार परिषद घेऊन पुढील रणनीती जाहीर करणार आहे, असे उदय महाले यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT