Chicalim Vasco Dainik Gomantak
गोवा

Vasco: वास्कोत बिगर गोमंतकीयाची मासळी विक्री; कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी

पालिका आणि पोलिसांनी याबाबत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Chicalim Vasco: चिखली वास्को चढावावरती बिगर गोमंतकीयाची मासळी विक्री सुरु आहे. मासळी विक्रेत्यांचा येथे कायमस्वरूपी बस्थान ठोकण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप स्थानिकांनी केला. पालिका आणि पोलिसांनी याबाबत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

वाडे ते चिखली वाहतूक रहदारीने गजबजलेल्या या राष्ट्रीय महामार्गावर मध्यंतरी चढावावरती गेल्या काही महिन्यापासून बिगर गोमंतकीय महीला मासळी विक्री करत आहे. महिलेचा याच ठिकाणी बस्थान ठोकण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप स्थानिक करत आहेत.

बिगर गोमंतकीय मासळी विक्रेत्यांनी अशा प्रकारे अनेक ठीकाणी बस्थान ठोकून रहदारी तसेच पादचाऱ्यांना आडकाठी निर्माण केली आहे. त्यांना आता तिथून हलवणे पालिकेला तसेच पोलिसांनाही जड झाले आहे.

Chicalim Vasco

दरम्यान या महामार्गावरून शेकडो वाहनांची रहदारी चालू असते. एखाद्या अपघातास देखील ही मासळी विक्रेता कारणीभूत ठरेल अशी शक्यता उपस्थित केली जात आहे. मागील बऱ्याच काळापासून महिलेला या जागेवरून हटविण्याची मागणी नागरिकांकडून तसेच वाहन चालकांकडून होत आहे.

यावर पालिकेने तसेच पोलिसांनी योग्य ती कारवाई करुन ही बळकावलेली जागा मोकळी करावी अशी मागणी स्थानिक करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT