Drinking Water Issue Dainik Gomantak
गोवा

Drinking Water Issue: भर उन्हाळ्यात पाणी नाही, सांकवाळ प्रभाग 3 मध्ये 8 दिवसांपासून नाही पाणी

सांकवाळ येथील पाण्याच्या वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने तसेच पाण्याच्या वाहिनीत विविध ठिकाणी गळती लागल्याने सांकवाळातील काही भागात पाणी टंचाई निर्माण होत आहे.

Pramod Yadav

Drinking Water Issue: सांकवाळ पंचायत क्षेत्रातील प्रभाग 03 मधील रहीवाशांना गेल्या आठ दिवसांपासून पिण्याचे पाणी येत नसल्याने, स्थानिकांनी वास्को बायणा येथील सार्वजनिक बांधकाम पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.

सदर कुठ्ठाळी - सांकवाळ भागातील पाणी उत्तरेतील तिसवाडी आगशी भागात वळविण्यात येत असल्याने साकवाळ परिसरात पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागल्याची माहिती स्थानिक पंच तुळशीदास दत्ता नाईक यांनी दिली आहे.

सांकवाळ पंचायत क्षेत्रातील प्रभाग 03 मधील रहीवाशांना गेल्या आठ दिवसांपासून पाणी पुरवठा होत नाहीय. विभागातील कुठ्ठाळीचे सहाय्यक अभियंते नरेश पैंगीणकर यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली होती. तक्रार देऊन सुद्धा पाण्याचा थेंबही या भागातील लोकांना येत नसल्याने, अखेर बुधवार (दि.12) सांकवाळ पंचायतीच्या प्रभाग 03 चे पंच तुळसीदास नाईक, मंगलदास नाईक,राजू नाईक, संतोष नाईक, रिमा नाईक व इतरांनी बायणा सा.बा.विभागातील सहाय्यक अभियंते नरेश पैंगीणकर यांच्या कार्यालयात जाऊन त्याना जाब विचारला.

दरम्यान, सांकवाळ येथील पाण्याच्या वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने तसेच पाण्याच्या वाहिनीत विविध ठिकाणी गळती लागल्याने सांकवाळातील काही भागात पाणी टंचाई निर्माण होत आहे. लवकरच पाण्याच्या वाहिनीला लागलेली गळती दुरुस्ती करून, त्वरीत पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल, अशी ग्वाही सहाय्यक अभियंते पैंगीणकर यांनी पंच नाईक व इतरांना दिली.

कुठ्ठाळी - सांकवाळ पंचायत क्षेत्रातील पाणी इतर ठिकाणी वळविण्यात येत आहे. दक्षिणेतील जनतेला पिण्याचे पाणी साळावली धरणातून पुरवले जाते. मात्र दक्षिण गोव्यातील पाणी चक्क उत्तर गोव्यातील तिसवाडी आगशी येथे वळविण्यात येत असल्याची माहिती पंच नाईक यांनी दिली. यामुळे कुठ्ठाळी - सांकवाळ भागात पाणी कमी प्रमाणात जनतेला मिळत आहे. असे नाईक म्हणाले.

उत्तरेत ओपा व आता दक्षिणेतील साळावली धरणाचे पाणी दिल्याने, भविष्यात दक्षिण गोव्याला मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या निर्माण होणार असल्याची माहिती पंच नाईक यांनी दिली.

येत्या दोन दिवसात सांकवाळ भागात पाणी पुरवठा सुरळीत झाला नाहीतर , या भागातील सर्व नागरीकांना घेऊन वास्को बायणा सा.बा.विभागावर मोर्चा घेऊन जाण्याचा इशारा स्थानिक रहीवांशी प्रदीप नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची ठिणगी आता गोव्यात; पाठिंबा वाढल्याने केंद्र सरकारवरील राजकीय दबाव अधिक तीव्र

Goa ITMS: 24 तासांत तब्बल 23.255 वाहतूक नियमांचे उल्लंघन! राज्यात 26 ठिकाणी 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम' प्रणाली कार्यान्वित

Goa Casino: गोव्यातील कॅसिनोंमध्ये 21 वर्षांखालील तरुणांना प्रवेशबंदी; कडक परवाना आणि 18% व्याजाची दंडात्मक कारवाई

पर्यटकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही! हणजूण, वागातोर आणि म्हापशात 'FDA'ची धडक मोहीम; अस्वच्छता आढळल्याने तीन दुकाने तात्काळ सील

Goa Bench: जन्मठेपेवरून थेट निर्दोष मुक्तता; मडगावातील दुहेरी खून प्रकरणी, सत्र न्यायालयाचा निकाल गोवा खंडपीठाने बदलला

SCROLL FOR NEXT