VACCINATION  Dainik Gomantak
गोवा

''गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना नियमावलीचे पालन आवश्यक''

कोविड लसीकरणास दोन दिवस सुट्टी; आरोग्य प्रशासनाने दिली माहिती

Sumit Tambekar

राज्यात आज गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण आहे. राज्यभरात घरोघरी लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य प्रशासनाने 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर, 2022 रोजी राज्यभरात कोरोना लसीकरणास सुट्टी असेल असे कळवले आहे. (NO VACCINATION FOR CHATURTHI FESTIVAL )

आरोग्य प्रशासनाने ही माहिती देताना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. तसेच गणेशोत्सव काळात सामूहिकरित्या एकत्र येण्याच्या शक्यता वाढतात त्यामूळे कोरोना नियमांचे पालन करण्याची विनंती ही राज्यातील जनतेला केली आहे.

गणेश चतुर्थीनिमित्त गोव्यात गर्दी होणार आहे. त्यामुळे सर्वांनी कोविड योग्य वर्तनाचे पालन करावे, अशी विनंती आहे. सामाजिक अंतर राखा, मास्क घाला आणि नियमित हात धुवा आणि स्वत:ला सुरक्षित ठेवा असं ही म्हटले आहे. तसेच 2 सप्टेंबर पासून लसीकरण नियमीत सुरु राहील असे ही म्हटले आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील जनतेला दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

आज गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर गोव्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आपण सर्वजण यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरकरित्या साजरा करुया आणि पर्यावरणाचं रक्षण करुया असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT