Datta Damodar Naik Dainik Gomantak
गोवा

धार्मिक वक्तव्य करणं भोवणार? दत्ता दामोदर नायक यांच्यावर अटकेची टांगती तलवार, अंतरिम जामीनावर शुक्रवारी सुनावणी

Datta Damodar Naik: नायक यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत मडगाव आणि काणकोण येथे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय.

Pramod Yadav

Datta Damodar Naik

मडगाव: 'धर्माच्या नावाखाली मंदिर, मठात पैसे लुटले जातात', असे वक्तव्य केलेल्या उद्योजक, लेखक दत्ता नायक यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज (०९ जानेवारी) दक्षिण गोवा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या अर्जावरील निकाल उद्यापर्यंत राखून ठेवण्यात आला आहे पण मध्यंतरीच्या काळात त्यांना अंतरिम जामीन द्यावा ही मागणी न्यायलयाने मान्य न केल्याने त्यांना अटक तर केली जाणार नाही ना असा संभ्रम निर्माण झाला आहे

उद्योजक, लेखक दत्ता दामोदर नायक यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी एका खासगी वृत्तवाहिनीला वाढदिवसाच्या निमित्ताने मुलाखत दिली होती. विविध विषयांवर भाष्य करताना दत्ता नायक यांनी धर्माच्या नावाखाली मंदिर, मठात खूप पैसे लुटले जातात, त्यामुळे मी मंदिरात दान करत नाही, असे वक्तव्य केले होते. याशिवाय राज्यात विविध क्षेत्रात भ्रष्टाचार सुरु असल्याने त्यांनी खंत व्यक्त केली होती.

दरम्यान, नायक यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत मडगाव आणि काणकोण येथे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. काणकोण पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम २९९ अंतर्गत त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला.

नायक यांच्याविरोधात राज्यभरातून पडसाद उमटू लागल्याने त्यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाल्याने त्यांनी अटकपूर्ण जामीनासाठी मडगाव कोर्टात अर्ज केला. जामीनावरील सुनावणी शुक्रवारी (१० जानेवारी) होणार आहे.

नायक यांची मुलाखत समोर आल्यानंतर दक्षिण गोव्याचे माजी खासदार नरेंद्र सावईकरांनी नायकांच्या वक्तव्याचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर करत आक्षेप नोंदवला होता.

'आस्तिक असणे किंवा नास्तिक असणे हा ज्याच्या त्याच्या विश्वास व श्रद्धेचा भाग. आपल्या विचारावर ठाम राहणे व त्याचा प्रचार करणे हे देखील योग्यच. पण त्यासाठी देवळे व मठ/मंदिरांनांच का म्हणून हिणवावे?', असे सावईकर म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT