Goa Eco Zone Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्री दिल्लीत! शेवटच्या दिवशीही सरकारने Goa Eco Sensitive Zone बाबत आक्षेप नोंदवला नाही

Goa Eco Sensitive Area: मुख्यमंत्री दिल्लीत गेल्याने तो विषय त्यांच्यापर्यंत तातडीने पोचवता आला नाही यामुळे आज त्याविषयीचा अधिकृत आक्षेप नोंदवणे सरकारला शक्य झाले नाही

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यातील १०८ गावांचा समावेश जैव संवेदनशील विभागात समावेश करणारी मसुदा अधिसूचना केंद्रीय वन, पर्यावरण व हवामानबदल मंत्रालयाने जारी केल्यानंतर आक्षेप नोंदविण्याच्या आज शेवटच्या दिवशी राज्य सरकारकडून कोणताही आक्षेप नोंदवण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे तातडीने दिल्लीला गेल्याने त्याविषयी निर्णय होऊ शकला नाही, अशी माहिती मिळाली आहे.

या विभागातून ४० गावे वगळण्याची मागणी राज्य सरकार करत आहे. त्याचा अभ्यास करून शास्त्रीय दृष्टिकोनातून शिफारस करण्यासाठी डेहराडून येथील भारतीय वन सर्वेक्षण संस्थेचे माजी महासंचालक डॉ. देवेंद्र पांडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. त्या समितीने आज सरकारला आपला अहवाल सादर केला.

त्या अहवालाच्या आधारे हा आक्षेप नोंदवण्यात येणार होता. समितीने दिलेल्या अहवालात सरकारला अपेक्षित असलेली ४० गावे वगळण्यात येण्याविषयी वाद आहे. त्या अहवालात त्याहून कमी गावेच वगळता येतील असे म्हटले आहे. त्यामुळे याविषयीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा यासाठी हा विषय त्यांच्यासमोर आज सायंकाळी नेऊन दिल्लीत पत्र पाठवले जाणार होते.

मुख्यमंत्री दिल्लीत गेल्याने तो विषय त्यांच्यापर्यंत तातडीने पोचवता आला नाही यामुळे आज त्याविषयीचा अधिकृत आक्षेप नोंदवणे सरकारला शक्य झाले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT