Rented cars Dainik Gomantak
गोवा

...म्हणून गोव्यात नवीन रेंट अ कार परवाने देणार नाही : मॉविन गुदिन्हो

पर्यटकांचे होणारे अपघात आणि पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी हे पाऊल उचलेल जात आहे.

दैनिक गोमन्तक

वास्को: गोव्यात फिरायला आलेले पर्यटक दुचाकी आणि चारचाकी गाड्या भाड्याने घेऊन पर्यटन स्थळांना भेट देतात. गाड्या भाडेतत्वावर देणारे (रेंट अ कार) अनेक लोक गोव्यात आहेत. याबाबत बोलताना परिवहन मंत्री मॉविन गुदिन्हो म्हणाले की, रेंट-ए-कार ऑपरेटर्सना परवाने देण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेतला जाईल. भविष्यात कमी परवाने दिले जातील. पर्यटकांचे होणारे अपघात आणि पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी हे पाऊल उचलेल जात आहे. (no new permits will be issued to rent a car agents in goa says transport minister Mauvin Godinho)

मॉविन गुदिन्हो म्हणाले की, त्यांच्या मंत्रिमंडळातील बहुतेक सहकाऱ्यांनी त्यांना विनंती केली आहे की रेंट-ए-कार चालकांना जास्त परवाने देऊ नका कारण गोव्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे, तसेच पुरेशा पार्किंग क्षेत्राअभावी लोक त्यांची वाहने बेजबाबदारपणे पार्क करत आहेत.

रेंट-अ-बाईक चालकांनी केलेल्या मागण्यांचा संदर्भ देताना मंत्री म्हणाले की, त्यांना पूर्वी परिस्थितीचा आढावा न घेता परवाने दिले जात असल्याने ही समस्या वाढली आहे. मी मागील आठ महिन्यांत एकही नवीन परवाना मंजूर केलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT