Davorlim  Dainik Gomantak
गोवा

Goa : दवर्लीतील 'त्या' वादग्रस्त घरमालकांकडे कुठलीही कागदपत्रंच नाहीत

पहिल्या दिवशी फक्त पाच घरांची पंचायती कडून तपासणी; अन्य घरांची तपासणी मागाहून होणार

सुशांत कुंकळयेकर

दवर्ली दिकरपाली पंचायत क्षेत्राखाली येणाऱ्या भगवती 99 या भागातील त्या वादग्रस्त घरांच्या मालकाशी या घरांच्या मालकीबद्दल कुठलीही कागदपत्रे नसल्याचे उघड झाले. त्या 166 घरापैकी पाच घरांची आज गुरुवारी पंचायतीकडून तपासणी करण्यात आली मात्र त्यापैकी एकाही घराचा मालक आपला अधिकार सांगणारी कागदपत्रे सादर करू शकला नाही.

आम्हाला राहुल वेर्लेकर यांनी येथे राहण्यास जागा दिली होती. आम्ही तिथे घरे उभारली अशी माहिती या लोकांनी दिली. तर या जमिनीचे आपण मालक असा दावा करणाऱ्या सुरेखा बांदोडकर यांनी आम्हाला काळोखात ठेऊन या जमिनीवर अतिक्रमण करून त्यावर घरे बांधली. सुरुवातीला आम्हाला सर्व्हे क्रमांक मिळण्यास उशीर झाला त्यामुळे हा प्रकार कळण्यास उशीर झाला, असा दावा केला आहे.

सरपंच हर्क्युलान नियासो यांनी यावेळी बोलताना, घरांना क्रमांक देणे आणि ही चौकशी याचा एकमेकाशी कसलाही संबंध नाही. आम्ही आलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई केली आहे. मात्र ही घरे उभारल्यास 15 वर्षे उलटून गेली. या बाबत तक्रार करण्यास जमीन मालकाने एव्हढा उशीर का लागला हेच कळत नाही, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT