Enviroment Minister goa Nilesh Cabral Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: नीलेश काब्राल मिस्टर क्लीन !

Goa Politics: नोकरभरतीत भ्रष्टाचार नाही: सरदेसाई यांनी दर्शविला पाठिंबा

दैनिक गोमन्तक

Goa Politics: दीपक पाऊसकर यांनी दीड वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरभरती केली होती. त्यावेळी त्यात मोठा भ्रष्टाचार आणि घोटाळा झाला, असा आरोप करणारे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी नीलेश काब्राल यांच्या अपारदर्शी नोकरभरती संदर्भात आज एकदम ‘यू टर्न’ घेऊन ही नोकरभरती प्रक्रिया करताना काब्राल यांनी कुठलाही भ्रष्टाचार केलेला नसून ते ‘मिस्टर क्लीन’ आहेत, असे म्हणत ही प्रक्रिया मागच्या प्रमाणे कुणी रद्द केल्यास आम्ही ते खपवून घेणार नाही, अशा शब्दांत काब्राल यांना प्रशस्तिपत्र दिले.

या नव्या राजकीय घडामोडींबद्दल त्यांच्या पक्षाची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कोणाला मंत्रिपदी ठेवावे आणि कुणाला हटवावे हा भाजपचा अंतर्गत प्रश्र्न आहे. आमचे त्याच्याशी काही देणे घेणे नाही. मात्र मी एवढेच सांगू शकतो, काब्राल हे नोकरी देण्यासाठी पैसे घेणारे नाहीत आणि नव्याने मंत्री झालेले आलेक्स सिकेरा हेही पैसे घेणारे नाहीत.

या नोकरभरतीवेळी काब्राल यांनी विजय सरदेसाई यांनी शिफारस केलेल्या 3 जणांना नोकऱ्या दिल्या आहेत. स्वतः सरदेसाई यांनीच ‘गोमन्तक’ला ही माहिती दिली. माझ्या एकाही उमेदवाराकडून त्यांनी पैसे घेतलेले नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

म्हणून काब्राल यांचा बळी: सिक्वेरा यांना मंत्री करण्यासाठी कुणालातरी पदावरून उतरविण्याची गरज होती. त्यात काब्राल यांचा बळी गेला. वास्तविक काब्राल यांनी तीन रेषीय प्रकल्प असो किंवा रेल्वे मार्ग दुपदरीकरण भाजपला नेहमीच पाठिंबा दिला. पण ते मऊ पडल्याने शेवटी त्यांचेच मंत्रिपद काढून घेतले गेले.,असे सरदेसाई म्हणाले.

हा ‘एम फॅक्टर’ !: सिक्वेरांना मंत्रिपद दिल्याबद्दल सरदेसाई यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली असता, हा ‘एम फॅक्टर’ आहे, असे ते म्हणाले, सिक्वेरा यांना ‘मिनिस्ट्री’ मिळाली, अन्य फुटलेल्यांना दुसऱ्या तऱ्हेचे ‘एम’ मिळाले असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT