Dabal Kirlapal Panchayat Dainik Gomantak
गोवा

Dabal Kirlapal Panchayat : किर्लपाल दाबाळ पंचायतीच्या सरपंचावर अविश्वास ठराव दाखल

ठरावावर 9 पंच सदस्यांपैकी 6 पंच सदस्यानी सह्या केल्या आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

Village Panchayat Dabal - Kirlapal : किर्लपाल दाबाळ पंचायतीच्या सरपंच रुख्मिणी गावकर यांच्या विरूद्ध सोमवारी अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. या ठरावावर 9 पंच सदस्यांपैकी 6 पंच सदस्यानी सह्या केल्या आहेत. आज सहा पंच सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या सचिवांकडे हा अर्ज सुपूर्द केला.

अविश्वास ठराव दाखल करण्याची कारणे यावेळी पंच सदस्यांनी सांगितले. गावच्या महत्वाच्या विकास कामांच्या निर्णयांमध्ये सरपंच रुख्मिणी गावकर पंच सदस्यांना विश्वासात घेत नाहीत. तसेच सरपंच गावकर महिन्यातून एकच मिटींग घेवून पंचायतीचा सर्व कारभार घरातून चालवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

गावात विकासकामे झाली नसल्याने जनता पंचांना दोष देत आहे. पंचायतीचा कारभार असाच सुरु राहीला तर गावचा विकास होणार नाही. त्यामुळे आम्ही सरपंच रुख्मिणी गावकर यांच्या विरूद्ध अविश्वास ठराव दाखल केल्याचे पंचांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: पणजीत 'अंमली पदार्थ तस्करी'चा पर्दाफाश! 15 लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक, मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू

मंत्री माविन, बाबूश यांना दिलासा, 'त्‍या' बहुचर्चित प्रकरणांना आव्‍हान न देण्‍याचा पोलिसांचा निर्णय

Goa Cyber Crime: दररोज 15 गोमंतकीय सायबर जाळ्यात! गुन्हेगारीचा वाढतोय फास; राज्यात सहा महिन्यांत 2,637 जणांना गंडा

Amit Shah Goa visit: भाजपच्या हालचालींना वेग; अमित शहा 7 सप्टेंबरला गोव्यात, बी. एल. संतोषही पुढील महिन्यात दौऱ्यावर

Sexual Assault Case: 4 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, खोर्ली-म्हापशात घृणास्पद कृत्य; स्थानिकांनी संशयिताला चोप देत पोलिसांच्या दिलं ताब्यात

SCROLL FOR NEXT