Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Madgaon Mayor : मडगाव नगराध्यक्ष घन:श्याम शिरोडकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल

चार नगरसेवकांनी नगरपालिका संचालक कार्यालयात हा ठराव दिला. मात्र हा अविश्वास ठराव नेमक्या कुठल्या कारणास्तव आणला गेला त्याचा कोणताही उल्लेख केलेला नाही.

सुशांत कुंकळयेकर

Madgaon Mayor : मडगावचे नगराध्यक्ष घनःश्याम शिरोडकर यांच्या विरोधात आज सोमवारी अपेक्षेप्रमाणे अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. आज चार नगरसेवकांनी नगरपालिका संचालक कार्यालयात हा ठराव दिला. मात्र हा अविश्वास ठराव नेमक्या कुठल्या कारणास्तव आणला गेला त्याचा कोणताही उल्लेख केलेला नाही.

उपनगराध्यक्ष दीपाली सावळ, यांच्यासह महेश आमोणकर, कामिल बार्रेटो आणि सगुण नायक हे चार नगरसेवक यावेळी उपस्थित होते. या ठरावावर भाजप गटाच्या 15 नगरसेवकांनी त्यावर सह्या केल्या आहेत.

मागच्या शुक्रवारी घनःश्याम शिरोडकर यांनी भाजप गटाचे दामोदर शिरोडकर यांना 15 -10 मतांनी पराभूत केले तर होते. त्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या सर्व नगरसेवकांना आपल्याकडे बोलावून घेऊन या सर्व नगरसेकांकडून अतीभोवतीच्या अविश्वास ठरावावर सह्या घेतल्या होत्या.

या संदर्भात घनःश्याम शिरोडकर यांना विचारले असता, अजून आपल्याकडे ठरावाची नोटीस आलेली नाही. ती जेव्हा येणार त्यावेळी काय करायचे ते पाहून घेऊ अशी प्रतिक्रीया व्यक्त केली.

निवडणूक गुप्त मतदानाद्वारे झाल्यामुळे भाजपच्या 5 नगरसेवकांनी विरोधी मतदान केले होते. मात्र अविश्वास ठरावावर हात दाखवून मतदान होणारं असल्याने किमान तीन नगरसेवकांनी घनःश्याम शिरोडकर यांच्या बाजूने उघडपणे मतदान केल्या शिवाय त्यांना आपली खुर्ची सांभाळणे कठीण होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संपादकीय: पैशांची मस्ती अन् सत्तेचा माज...

Goa Rakhonn Yatra: 'कळंगुटच्या राखण यात्रेसाठी केपेतील लोकांना पैसे देऊन आणले'; मायकल लोबो यांचा काँग्रेसवर घणाघात

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

Thailand Heavy Rainfall: पूराच्या पाण्यात बुडाले बँकॉक, 7 लाख नागरिक प्रभावित, रस्त्यांवर सापांचा वावर; थायलंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार VIDEO

Teachers Salary Issue: 'त्या' 3 हजार शिक्षिकांना वेतनवाढ कधी? अमित पाटकर आक्रमक; सरकारला 8 दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT