Nitin Gadkari Dainik Gomantak
गोवा

Nitin Gadkari करणार 911 कोटीच्या प्रकल्पांची पायाभरणी; पर्वरीत सहापदरी फ्लायओव्हर, झुआरी पुलावरील ट्विन टॉवर्स

22 डिसेंबरला नवीन झुआरी पुलाच्या दुसऱ्या लेनच्या उद्घाटन

Akshay Nirmale

Nitin Gadkari Goa Visit: नवीन झुआरी पुलाच्या दुसऱ्या लेनचे उद्घाटन 22 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, यावेळी या उद्घाटनासह दोन मोठ्या प्रकल्पांचीही पायाभरणी होणार आहे.

नवीन झुआरी पुलावरील ट्विटन टॉवर आणि पर्वरी हायवे कॉरिडॉर असे हे दोन प्रकल्प असणार आहेत. याचा एकत्रित खर्च 911 कोटी रूपये इतका असणार आहे.

झुआरी पुलावरील टि्वन टॉवरवर आणि फिरत्य रेस्टॉरंटचा एकूण खर्च 270 कोटी रुपये असणार आहे. तर NH-66 (पूर्वीचा राष्ट्रीय महामार्ग 17) वर गिरी आणि पर्वरी दरम्यान सहा-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉर (फ्लायओव्हर) साठी पायाभरणी केली जाईल. हा उड्डाणपूल 641 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे.

गतवर्षी डिसेंबरमध्येच नितीन गडकरी यांच्याच उपस्थितीत नवीन झुआरी पुलाच्या एका लेनचे उद्घटान झाले होते. त्यानंतर एक वर्षाने दुसऱ्या बाजूच्या लेनचे उद्घाटन होत आहे. यासाठी सुमारे 2500 कोटी रूपये खर्च आला आहे.

काही दिवसांपुर्वी परिवहन मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिल्लीमध्ये मंत्री गडकरी यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी गडकरी यांना नवीन झुआरी पुलाच्या दुसऱ्या लेनच्या उद्घाटनासाठी येण्याबाबत निमंत्रण दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT