NIT Goa | NEP 2020 Dainik Gomantak
गोवा

एनआयटी-गोवा मध्ये इंजिनिअरिंगचे विद्यार्थी करणार योग, वैदिक गणित, अर्थशास्त्राचा अभ्यास

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा एक भाग म्हणून, विद्यार्थ्यांना इतर अभियांत्रिकी विभागातील विषयांचा अभ्यास करण्याची परवानगी मिळणार आहे.

Pramod Yadav

NIT Goa: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT), गोवा येथील बीटेक प्रोग्रामचे विद्यार्थी आता भारतीय ज्ञान प्रणाली आणि नाट्यशास्त्र संबधित अभ्यासक्रमांचा समावेश केला जाणार आहे.

शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 लागू केले जाणार आहे.

"नवीन अभ्यासक्रमात आरोग्य, योग, वैदिक गणित, वैदिक साहित्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान, व्यावसायिक नैतिकता आणि मानवी मूल्ये यासारख्या भारतीय ज्ञान प्रणालीशी संबंधित अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

पुढील वर्षी, 'प्राचीन आर्थशास्त्र' नावाचा अभ्यासक्रमाचा समावेश केला जाईल. यात कौटिल्यच्या अर्थशास्त्राद्वारे भारतीय दृष्टीकोन या अभ्यासक्रम शिकवला जाईल, अशी माहिती एनआयटी गोवाचे संचालक प्रा. ओमप्रकाश जैस्वाल यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली.

वैविध्यपूर्ण विषयांची विद्यार्थ्यांना ओळख करून दिल्यास त्यांचा तणाव कमी होण्यास मदत होईल, असेही जैस्वाल म्हणाले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा एक भाग म्हणून, विद्यार्थ्यांना इतर अभियांत्रिकी विभागातील विषयांचा अभ्यास करण्याची परवानगी मिळणार आहे. सामान्यत: विद्यार्थी एका सत्रात सहा विषयांचा अभ्यास करतात, परंतु उच्च वर्गात गेल्यावर सहा विषयांचे पाच विषय होतात आणि एका विषयासाठी जागा रिकामी असते.

या एका विषयाच्या ठिकाणी विद्यार्थी इतर विषयांचा अभ्यास करु शकेल. उदाहरणार्थ, यांत्रिक अभियांत्रिकीमधील बीटेकचा विद्यार्थी इतर विषय म्हणून संगणकीय गणिताचा अभ्यास करू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT