Goa Bank Fraud Dainik Gomantak
गोवा

Goa Bank Fraud: नऊ बँकांना तब्बल 'एवढ्या' लाखांचा घातला गंडा; भामटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात

कर्नाटकात कारवाई : बनावट कागदपत्रे सादर करून लुबाडल्याचे उघडकीस

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Bank Fraud: बनावट कागदपत्रे सादर करून विविध बँकांना तब्बल 72लाखांचा गंडा घालणाऱ्या कर्नाटकातील भामट्याला पर्वरी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.

संशयिताचे नाव दिलीप बी. राजगौडा (वय 32 वर्षे, रा. गिरीनगर, विद्यागिरी, धारवाड) असून त्याच्या पत्नीचे नाव प्रीती मंजुनाथ असे आहे.

25 जुलै 2022 रोजी पंजाब नॅशनल बँकेच्या पर्वरी शाखेचे व्यवस्थापक योगेश शर्मा यांनी एका जोडप्याने बँकेची 8 लाखांची फसवणूक केल्याची तक्रार पर्वरी पोलिस ठाण्यात नोंदवली होती.

या जोडप्याने कर्नाटकातील एका मृत व्यक्तीच्या बनावट कागदपत्रांचा वापर करून आपण सामंतक सुबराव काडेकोडी आणि पत्नी कविता मुनी बसवराज असल्याचे भासवून सफेद होंडा कंपनीची कार (जीए-०३-झेड-६५९१) घेण्यासाठी बनावट विमा कागदपत्रे दाखवून आठ लाखांचे वाहन कर्ज घेतले.

नंतर ती गाडी एका एजन्सीद्वारे बेळगाव येथे विकली आणि तो फरार झाला. पोलिसांनी ही गाडी जप्त केली असून कर्नाटक पोलिसांच्या मदतीने बंगळुरू येथे संशयितास ताब्यात घेतले. गोव्यात आणून अटक केल्यावर चार दिवसांचा रिमांड घेतला आहे.

याच भामट्याने पर्वरी येथील इंडियन ओव्हरसीज बँकेलाही अशाच प्रकारे लुबाडल्याची दुसरी तक्रार नोंद करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा तपास उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विश्वेश कर्पे आणि निरीक्षक अनंत गावकर यांच्या टीममधील उपनिरीक्षक प्रतीक भट प्रभू, पोलिस शिपाई योगेश शिंदे, तुषार राऊत व इतरांनी केला. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती वाल्सन यांनी दिली.

उच्चशिक्षित तरुणाचे कारनामे

दिलीप हा उच्चशिक्षित असून त्याने ‘बी-टेक’ पदवी मिळवली आहे. तसेच वेगवेगळ्या विमा कंपन्यांमध्ये काम केले आहे. गोव्यातील दोन आणि कर्नाटकामधील सात बँकांमध्ये बनावट कागदपत्रे सादर करून त्याने तब्बल ७२ लाख रुपये लुटल्याची माहिती वाल्सन यांनी दिली.

कर्ज फेडण्यासाठी निवडला मार्ग

संशयित दिलीपने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या भावाने आयपीएलमध्ये बेटिंगवर पैसे लावले होते. मात्र, त्या तो हरल्यानंतर, ते कर्ज फेडण्यासाठी त्याने हा मार्ग अवलंबिला.

दरम्यानच्या काळात त्याला अपघातही झाला. त्यात त्याने किडनी गमावली. ते ऑपरेशन करण्यासाठीही त्याला पैसे पाहिजे होते. म्हणून त्याने हा मार्ग अवलंबला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT