Mapusa  Dainik Gomantak
गोवा

Mapusa News : धिल्लन हत्येप्रकरणी मुंबईत दोघांना अटक

Mapusa News : संशयितांना १० दिवसांची पोलिस कोठडी

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa News : म्हापसा मार्रा-पिळर्ण येथील हॉरिझन्स आझुरा प्रकल्पातील काही व्हिलांचे मालक असलेले नरोत्तम सिंग उर्फ निम्स धिल्लन (७७) यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला होता.

याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी जितेंद्र साहू (३२) व नीतू राहुजा (२२) दोघेही रा.भोपाळ यांना अटक केली असून, संशयितांकडून पोलिसांनी ४७.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

या दोघा संशयितांना आज सोमवारी (ता.५) दुपारी म्हापसा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, धिल्लन हे पंजाबच्या एका माजी मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक होते.

प्राप्त माहितीनुसार, रविवारी (ता.४) सकाळी धिल्लन हे आपल्या व्हिलातील बेडवर निपचित आढळले होते. त्यांच्या चेहऱ्यावर व शरीरावर काही जखमा होत्या. तसेच त्यांच्या अंगावरील सुवर्णलंकार व मोबाईल फोन गायब होता.

तिसऱ्याचा शोध सुरू

या संशयितांना नवी मुंबई गुन्हे शाखाच्या पथकाच्या सहाय्याने वाशी-मुंबई टोलनाक्यावर अडवून जितेंद्र व नीतू यांना ताब्यात घेण्यात आले.

त्यांच्याकडून चोरीचा ४७.८२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांचा मित्र असलेला तिसरा साथीदार संशयित कुणालचा सध्या पोलिस शोध घेताहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT