Nilkanth Halarnkar Dainik Gomantak
गोवा

मच्छीमार व्यावसायिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवणार : हळर्णकर

मच्छीमार व्यावसायिकांनी खात्याच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचंही मंत्र्यांचं आवाहन

दैनिक गोमन्तक

मोरजी : मांद्रेतील मच्छीमार बांधवांनी आपल्या समस्या लेखी स्वरूपात खात्याला द्याव्यात, त्यांच्या समस्या सोडवल्या जातील. तसेच मच्छीमार व्यावसायिकांनी खात्याच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपने मोरजी-टेम्बवाडा येथील कुलदेवता सभामंडपात शनिवारी 11 जून रोजी इतर मागासवर्गीय समाज संमेलनाचे आयोजन केले होते. यावेळी मांद्रेचे माजी आमदार दयानंद सोपटे, स्थानिक पंचसदस्य पवन मोरजे, पंच विलास मोरजे, प्रकाश शिरोडकर, मांद्रे भाजप मंडळ अध्यक्ष मधू परब तसेच स्थानिक मच्छीमार उपस्थित होते.

मांद्रेतील किनारी भागात जेटी उभारण्यात आलेली नाही. जागा उपलब्ध झाल्यानंतर आपण हा प्रश्न सोडवणार असल्याचे हळर्णकर यांनी सांगितले. मांद्रेतील मच्छीमार बांधवांनी दर आठवड्याला एक दिवस मच्छीमार खात्याचा अधिकारी प्रत्येक पंचायत कार्यालयात उपलब्ध असतो, त्यांच्याकडे आपल्या समस्या लेखी स्वरूपात द्याव्यात. दर महिन्याला जर एक बैठक गावागावांत बोलावली तर मंत्री तसेच खात्याचे अधिकारी या ठिकाणी येऊन आपल्याला मार्गदर्शन करतील, अशी ग्वाही हळर्णकर यांनी दिली.

खात्याच्या योजना व्यावसायिकांपर्यंत पोचवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन सोपटे यांनी केले. गेल्या पाच वर्षांपासून किनारी भागात मच्छीमार व्यावसायिकांना त्यांच्या होड्या ठेवण्यासाठी जागा उपलब्ध झालेली नाही. मच्छीमार बांधव आपापल्या होड्या मिळेल त्या ठिकाणी ठेवतात. हळर्णकर यांनी या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी पंच पवन मोरजे यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

SCROLL FOR NEXT