Nilesh Cabral Dainik Gomantak
गोवा

Nilesh Cabral : असुविधांचे खापर काब्रालांनी फोडले अपुऱ्या मनुष्यबळावर

मुख्य सचिवांकडे फाईल्स अडकल्‍याने कामे रखडली असल्याचा दावा

दैनिक गोमन्तक

Nilesh Cabral : सार्वजनिक बांधकाम खात्‍याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी परत एकदा प्रशासनाकडे अंगुलीनिर्देश करत मनुष्‍यबळ कमी असल्‍याने कामे होत नसल्याची खंत व्‍यक्त केली आहे. खात्‍याचा कारभार खुद्द मुख्य सचिव सांभाळत आहेत. त्यांच्याकडे फाईल्स अडकल्‍याने कामांचा खोळंबा होत असल्याचा खुलासा काब्राल यांनी सोमवारी पर्वरी मंत्रालयात माध्यमांशी बोलताना केला.

‘मुख्य सचिवांकडे कामाचा भार जास्त असल्याने मर्यादित वेळेत फाईल्स हातावेगळ्या होत नसल्याने त्या माझ्याकडे फाईल्स उशिरा पोहोचतात. त्यामुळे खात्यातील कामे खोळंबण्याचा प्रकार सध्या घडत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून गरज पडल्यास सचिव बदलणार आहे’, असे काब्राल यांनी स्पष्ट केले. खड्ड्यांमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तर काही ठिकाणी पाणीपुरवठाही सुरळीत सुरू नाही. यावर पत्रकारांनी काब्राल यांना जाब विचारला असता, त्‍यांनी खात्‍याकडून होत नसलेल्‍या कामांचे खापर अपुऱ्या मनुष्‍यबळावर फोडले.

अभियंत्यांच्या 50 टक्के जागा रिक्त

राज्‍यात 50 टक्के अभियंत्‍यांची पदे रिक्त आहेत. शिवाय मुख्‍य सचिवांकडे कामाचा ताण आहे. त्‍यामुळे अनेक फाईल्स त्‍यांच्‍याकडे अडकून राहतात. त्यामुळे कामे होत नाहीत किंवा रखडतात. ही रिक्त पदे तातडीने भरण्‍याबरोबरच मुख्‍य सचिवांना मदतगार म्‍हणून अन्‍य सचिवांची नेमणूक केली जाईल. याबाबत आपण मुख्‍यमंत्र्यांशी चर्चा केली आहे, असे काब्राल यांनी सांगितले.

कंत्राटदारच जबाबदार

रस्‍त्यांवरील खड्डे जेट पॅचर मशीनद्वारे बुजविले जात आहेत. मशीनद्वारे काम व्यवस्थित न झाल्यास त्याची जबाबदारी कंत्राटदारावर आहे. खड्डे बुजवण्यासाठीचे ॲपच्या वापरासंदर्भात अभियंते, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. सर्व खड्डे बुजवण्यात आल्यानंतर ते ॲप सार्वजनिक केले जाईल, अशी माहिती काब्राल यांनी दिली.

माझ्याकडे ‘तो’ आदेश नाही

साबांखातील नोकरभरतीबद्दल काब्राल म्हणाले, खात्यातील तांत्रिक पदे भरण्यासाठी सुरू केलेली प्रक्रिया उच्च न्यायालयाने रद्द करण्याचा निवाडा दिला आहे. परंतु, त्याबाबत माझ्याकडे कोणताही आदेश पोहोचलेला नाही. खात्यात मोठ्या प्रमाणात तांत्रिक आणि प्रशासकीय पदे रिक्त आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fake Call Center: पार्टी, नाईटलाईफच्या नादात तरुण बनले गुन्हेगार; गोव्यातील बनावट कॉल सेंटर्सचा पर्दाफाश, परराज्यातील 50 हून अधिक तरुण ताब्यात

Virat Kohli Golden Duck: किंग इज बॅक... पण शून्यावर! कोहलीकडून 4 वर्षांनंतर पुन्हा एकदा नकोशा विक्रमीची पुनरावृत्ती

Horoscope: सोमवारी 'या' राशींना लाभणार नशिबाची साथ; महादेवाच्या कृपेने मार्गी लागतील सर्व अडलेली कामे!

क्रिकेट विश्वात खळबळ! रोहित शर्मा पाकिस्तानचा कर्णधार? LIVE सामन्यात ब्रॉडकास्टरची मोठी चूक Watch Video

Crime News: क्रूरतेचा कळस! प्रेमात मिळाला धोका, संतापलेल्या प्रेयसीने ब्लेडने प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट कापला

SCROLL FOR NEXT