Highway Dainik Gomantak
गोवा

Nuvem Highway: नुवे येथे महामार्ग रुंदीकरणाला स्थानिकांचा विरोध; खासदार फर्नांडिस यांनी दिली सर्वेक्षणाची खात्री

Viriato Fernandes: रुंदीकरणाच्या अंतिम निर्णयापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे पाहणी व सर्वेक्षण करण्यात येईल, असे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी नागरिकांना सांगितले

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: नुवे येथील फादर आग्नेल शिक्षण संस्था ते होंडा शोरूम सर्कलपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग ६६ चे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, याला स्थानिकांचा विरोध आहे. या रुंदीकरणामुळे काही घरे मोडावी लागतील, तर काही घरांचे प्रवेशद्वार थेट रस्त्याला भिडतील. शिवाय या रस्त्याच्या समांतर पश्र्चिम बगल दुपदरी रस्ता असल्याने या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत नाही.

कार्मेल महाविद्यालय ते होंडा शोरूम सर्कलपर्यंतचा रस्ता अगदी अरुंद असल्याने व रस्त्यालगत घरे व इमारती असल्याने या भागाचे रुंदीकरण कठीणच असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

नुवे येथील नागरिकांनी दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांची भेट घेतली व त्यांच्या कानावर ही बाब घातली.

या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या अंतिम निर्णयापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे पाहणी व सर्वेक्षण करण्यात येईल, असे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी नागरिकांना सांगितले.

या बैठकीवेळी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आश्वीन चंद्रू (आयएएस) उपस्थित होते. त्यांनीसुद्धा स्थानिकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले, असे एवर्सन वालेस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale jail: कोलवाळ जेलच्या भिंतीआड 'काळाबाजार'? कैद्यांना मद्य, अमली पदार्थ, स्मार्टफोन अन् परफ्युमचा 'स्पेशल सप्लाय'; धक्कादायक माहिती समोर

Bison In Goa: एक दोन नव्हे तर तब्बल 9 गवे! कुर्टी परिसरात गव्यांच्या टोळीचा बिनधास्त वावर; स्थानिकांत भीती, रानात हुसकावून लावण्याची मागणी

"तुम्ही RSS चे एजंट बनलात..." कश्मीरी पंडितांना दहशतवाद्यांची पुन्हा उघड धमकी; नावासह घर क्रमांक लिहून पाठवलं चिथावणीखोर पत्र

Navpancham Yog 2026: सप्टेंबर महिन्याची सुरुवातच ठरणार जॅकपॉट! गुरु-शनिच्या 'नवपंचम योगा'ने चमकणार 4 राशींचे नशीब; घरात नांदणार सुख-समृद्धी

Morjim Drugs Bust: मोरजीतील गेस्ट हाऊसवर पोलिसांचा छापा; 'ड्रग्स' रॅकेटचा पर्दाफाश, तीन सेनेगाली नागरिक अटकेत, 33 लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT