Rain News  Dainik Gomantak
गोवा

येत्या चार ते पाच दिवसात गोव्याच्या काही भागात पावसाची शक्यता

''मान्सुन हा केवळ पावसाच्या गतीवर अवलंबुन नसतो तर वारे, आणि वातावरणावर देखील अवलंबून असतो''

दैनिक गोमन्तक

पणजी: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पश्चिमेकडील वारे दक्षिण अरबी समुद्रावरील खालच्या पातळीत मजबूत आणि खोल झाले आहेत. केरळ किनारपट्टी आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर ढगाळ वातावरणात वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या 2- 3 दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्यास होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. (next four days, Goa will be released from the heat of summer)

हवामान खात्याने याबाबत म्हटले आहे की, 26 मे रोजी गोव्यातील काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली. यामध्ये बांबोळी, वास्को व इतर ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी बरसल्या आहेत. तेसेच पुढील तीन चार दिवस राज्यात अशाच प्रकारे तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

आज पणजीच्या वातावरणाचा विचार केला असता कमाल 33.5 अंश सेल्सिअस तर किमान 25.7 अंश सेल्सिअस पावसाची नोंद झाली. पणजी वेधशाळेचे वैज्ञानिक एम.राहुल याबाबत बोलताना म्हणाले की, मान्सुन हा केवळ पावसाच्या गतीवर अवलंबुन नसतो तर वारे, आणि वातावरणावर देखील अवलंबून असतो. त्यामुळे त्यामुळे पुढील चार-पाच दिवस राज्यातील काही भागात पाऊस होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

गोव्यातील काही भागात गेल्या काही दिवसात ढगाळ वातावरण असले तरी हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 4 ते 5 दिवसात गोव्यातील काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उत्तर गोव्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पाऊस ढगांच्या गडगडाटासह सुरू राहण्याची शक्यता आहे. सद्या दक्षिण गोव्यातील अनेक तालुक्यात उन्हाचा तडाखा सुरु आहे. असेच वातावरण उत्तर गोव्यातील तालुक्यामध्ये राहण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT