Sattari Monsoon Health Campaign Dainik Gomantak
गोवा

Goa Malaria Awareness: साथीच्या रोगांविरोधात 'सत्तरी'सज्ज; प्रतिबंधक उपाय सुरू, आरोग्य विभागाचे गावोगावी सर्वेक्षण

Sattari Monsoon Health Campaign: आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सत्तरी तालुक्यात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, टायफॉईड यांसारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

वाळपई: आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सत्तरी तालुक्यात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, टायफॉईड यांसारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. पावसाळ्यात साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन स्वच्छता मोहीम, डासांच्या पैदाशीवरील नियंत्रण, तपासणी मोहीम तसेच व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

वाळपई सामाजिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात विविध भागांत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. भोंमवाडा-पाडेली परिसरात आरोग्य विभागाने स्वच्छता मोहीम राबवून डासांच्या पैदाशीची तपासणी केली. कंटेनर तपासणीदरम्यान एकूण २० कंटेनरची पाहणी करण्यात आली.

त्यापैकी एका कंटेनरमध्ये डासांची पैदास आढळून आली, तर दोन बांधकाम स्थळांची तपासणी केली असता तेथे कोणतीही डासांची पैदास आढळली नाही. या मोहिमेत सॅनिटरी इन्स्पेक्टर गजानन पार्सेकर, डॉ. अभिजित वाडकर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. २३ मे रोजी मेलावली येथे ‘एएएम’ उपक्रमांतर्गत डेंग्यू प्रकरणाची तपासणी आणि घराघरांत जाऊन सर्वेक्षण करण्यात आले.

पाण्याचा निचरा करा!

जलसिंचन खात्याच्या विविध चेंबर्समध्ये पाणी साचून मच्छरांची पैदास होऊ नये यासाठी संबंधित विभागालाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पाण्याचा योग्य निचरा करणे आणि स्वच्छतेची काळजी घेणे बंधनकारक करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT