Bicholim रिक्त सरपंच पदासाठी अर्ज भरलेल्या संदीप सालेलकर आणि शंकर जल्मी यांना समान मते पडल्याने अखेर 'लॉटरी' पद्धतीचा अवलंब करण्यात आला.  Dainik Gomanatak
गोवा

संदीप सालेलकर यांना पंचायतीच्या 'सरपंचपदाची' लागली 'लॉटरी'

रिक्त सरपंच पदासाठी अर्ज भरलेल्या संदीप सालेलकर आणि शंकर जल्मी यांना समान मते पडल्याने अखेर 'लॉटरी' पद्धतीचा अवलंब करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

डिचोली: पिळगाव पंचायतीच्या सरपंच (Sarpancha) पदाच्या निवडणुकीत संदीप दत्ता सालेलकर (Sandeep Salelkar) भाग्यवान ठरले आहेत. त्यांना सरपंच पदाची लॉटरी लागली आहे. रिक्त सरपंच पदासाठी अर्ज भरलेल्या संदीप सालेलकर आणि शंकर जल्मी यांना समान मते पडल्याने अखेर 'लॉटरी' पद्धतीचा अवलंब करण्यात आला. त्यात संदीप सालेलकर हे नशीबवान ठरताना त्यांना सरपंच पदाची 'लॉटरी' लागली. विशेष म्हणजे संदीप सालेलकर यांच्या गटातील एका पंचसदस्याला निवडणुकीस उपस्थित राहता आले नाही. तरीदेखील अखेर नशिबाने साथ दिल्याने सत्ता हस्तगत करण्याचे या गटाचे मनसुबे अखेर सफल झाले.

एक पंच अनुपस्थित

रिक्त सरपंच पदाची निवड करण्यासाठी आज (गुरुवारी) सकाळी पंचायत मंडळाची बैठक घेण्यात आली. बैठकीस सातपैकी उपसरपंच सौ. उर्मिला प्रभूगावकर यांच्यासह संदीप सालेलकर, अनिल नाईक, शंकर जल्मी, प्रदीप नाईक आणि ललना गिमोणकर हे सहा उपस्थित होते. तर एका प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असल्याने पंच स्वप्नील फडते यांना बैठकीस उपस्थित राहता आले नाही.

'लॉटरी' द्वारे निवड

सरपंच पदासाठी मावळते सरपंच शंकर (निलेश) जल्मी आणि संदीप सालेलकर या दोघांनी अर्ज भरले. दोन्ही अर्ज ग्राह्य धरल्यानंतर सरपंचांची निवड करण्यासाठी मतदान घेण्यात आले. त्यात श्री. जल्मी आणि श्री. सालेलकर यांना प्रत्येकी 3 अशी समान मते पडली. नंतर उपस्थित पंचसदस्यांच्या मान्यतेनुसार निर्वाचन अधिकारी तथा गट विकास कार्यालयाचे विस्तार अधिकारी भारत महाले यांनी 'लॉटरी'पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला. त्यात संदीप सालेलकर भाग्यवान ठरले. निवडणूक प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी पंचायत सचिव मोनाली बेतकीकर यांनी सहकार्य केले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT