CM pramod sawant | New Portal People of Goa  dainik gomantak
गोवा

गोमंतकीय जनतेच्या तक्रारीसाठी नवे पोर्टल

लाभार्थींसाठी एसएमएस प्रणाली

दैनिक गोमन्तक

पणजी : डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने आज 100 दिवस पूर्ण केले. यानिमित्ताने विधानसभा संकुलात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी राज्यातल्या नागरिकांच्या तक्रारीसाठी नवे पोर्टल कार्यान्वित केले.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘लोकांपर्यंत सुशासन पोहोचवण्यासाठी सरकार धाडसी पावले उचलत आहे. जमीन घोटाळ्यासंबंधीची एसआयटी चौकशी, बेकायदेशीर स्पा आणि मसाज पार्लरवरील छापे ही त्याचीच उदाहरणे आहेत.’ यावेळी मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्री, आमदार उपस्थित होते.

राज्यात वन हक्क कायद्यांतर्गत सुमारे दहा हजार नागरिकांनी आपला दावा सांगितला आहे. त्यापैकी 355 नागरिकांना यापूर्वीच वन हक्क सनद देण्यात आली आहे. आज या कार्यक्रमात आणखी 100 लाभार्थींना वन हक्क सनद प्रदान करण्यात आली.

लाभार्थींसाठी एसएमएस प्रणाली

तक्रारी, सूचना सरकारपर्यंत पोहोचावीत याकरिता तक्रार पोर्टलचे अनावरण झाले. शिवाय गृह आधार, दयानंद सामाजिक सुरक्षा व कला सन्मान योजनांचे पैसे जमा झाल्याबाबतची एसएमएस सूचना प्रणाली सुरू झाली. योजनेतील लाभार्थींना त्यांचे पैसे बँक खात्यावर जमा झाल्याचा संदेश मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

SCROLL FOR NEXT