Valpoi Government Hospital  Dainik Gomantak
गोवा

Valpoi Health Centre: वाळपई आरोग्य केंद्रात फिजिओथेरपी सेंटरची सुरुवात; सत्तरीसाठी मोठी सोय

Valpoi Government Primary Health Centre: वाळपईत फिजिओथेरपी सेंटर सुरु करावे याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: येथील शासकीय आरोग्य केंद्रात येथे नवीन फिजिओथेरपी सेंटरची सुरुवात करण्यात आली आहे. या सेवेमुळे सत्तरीतील फिजिओथेरपी घेणाऱ्या रुग्णांची चांगली सोय होणार आहे.

वाळपईत फिजिओथेरपी सेंटर सुरु करावे याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. फिजिओथेरपी सेंटर नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. याची दखल घेत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी वाळपई आरोग्य केंद्रात फिजिओथेरपी सेवा सुरु केली आहे.

याबाबत आरोग्याधिकारी डॉ. विकास नाईक यांनी सांगितले की, फिजिओथेरपी सेंटर सुरू होणे हे वाळपईमध्ये आरोग्य सेवा वाढविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नाचे एक मोठे पाऊल आहे. हा उपक्रम आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी या केंद्राची गरज ओळखून सुरू केला आहे.

सत्तरीतील ग्रामिण भागातील रुग्णांना फिजिओथेरपीचे उपचार घेण्यासाठी बाहेर जावे लागत होते. तसेच या उपचारासाठी खासगी इस्पितळात मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करावे लागत होते.

आता या ठिकाणी ही सुविधा मोफत उपलब्ध केल्याने रुग्णांना मोठा फायदा होणार आहे. सोमवार ते शनिवारी ओपीडीच्या वेळी ही सुविधा सर्वांसाठी खुली असणार आहे. त्यामुळे रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे ते म्हणाले.

डॉ. अनुजा गावस यांच्याकडे जबाबदारी

या नव्या केंद्राचे जबाबदारी फिजिओथेरपिस्ट डॉ. अनुजा गावस यांच्याकडे सोपवण्यात आली असून त्यांनी या नवीन उपक्रमाचा भाग बनून आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णांना दुखापतीतून बरे होण्यास, तीव्र परिस्थिती व्यवस्थापित करण्यास आणि त्यांचे एकूण आरोग्य सुधारण्यास मदत करण्यासाठी प्रभावी फिजिओथेरपी उपचार प्रदान करणे हे आमचे ध्येय आहे, असे त्या म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT