Sunburn 2024 Canva
गोवा

Sunburn 2024: ‘सनबर्न’च्या 'एनओसी'ला खंडपीठामध्ये आव्हान! पंचायतीला परवान्याची प्रत सादर करण्याचे निर्देश

Sunburn Festival Dhargalim: राज्यात दरवर्षी होणाऱ्या सनबर्न ईडीएम महोत्सवाला धारगळला परवानगी देण्यास स्थानिकांचा जोरदार विरोध असतानाही पंचायतीने घेतलेल्या मंडळ बैठकीत तात्पुरता परवाना किंवा ना हरकत दाखला (एनओसी) देण्याचा ठराव संमत झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

Sunburn Festival 2024 Petition

पणजी: राज्यात दरवर्षी होणाऱ्या सनबर्न ईडीएम महोत्सवाला धारगळला परवानगी देण्यास स्थानिकांचा जोरदार विरोध असतानाही पंचायतीने घेतलेल्या मंडळ बैठकीत तात्पुरता परवाना किंवा ना हरकत दाखला (एनओसी) देण्याचा ठराव संमत झाला. या निर्णयाला भरत नारायण बागकर यांनी नव्याने याचिका सादर केली आहे. या याचिकेवरील सुनावणी यापूर्वी उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सनबर्न महोत्सवासंदर्भात याचिकेवरील सुनावणीवेळी ९ रोजी एकत्रित घेण्यात येणार आहे.

उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या जनहित याचिकेवरील मागील सुनावणीवेळी सरकारने तसेच धारगळ पंचायतीने सनबर्न ईडीएम महोत्सवाला परवानगी दिलेली नाही, असे सांगितले होते. या महोत्सवासंदर्भात सरकार किंवा पंचायत काय निर्णय घेते यासाठी खंडपीठाने त्यावरील सुनावणी ९ डिसेंबरपर्यंत तहकूब केली होती. धारगळ पंचायतीने २ डिसेंबरला घेतलेल्या पंचायत मंडळाच्या बैठकीत ९ पंचसदस्यांपैकी ५ जणांनी ना हरकत परवाना किंवा तात्पुरता परवाना देण्यास संमती दर्शविली. या निर्णयाची प्रत धारगळ पंचायतीकडे मागूनही ती दिली जात नाही. त्यामुळे हा निर्णय रद्द करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

धारगळ पंचायतीने २९ नोव्हेंबर रोजी ग्रामसभा बोलावली होती. त्यावेळी धारगळ पंचायत क्षेत्रात सनबर्न आयोजनास एकमताने लोकांनी विरोध करण्याचा ठराव घेतला होता. या ग्रामसभेला ९२ जण उपस्थित राहिले होते. १ डिसेंबर रोजी विरोध दर्शवण्यासाठी धारगळ गावासह पेडणे तालुक्यामधील सुमारे ३ हजार ग्रामस्थ पंचायतीसमोर जमा झाले होते व निदर्शने केली होती. त्यानंतर २ डिसेंबरला पंचायतीची बैठक झाली त्यामध्ये सनबर्नला ना हरकत दाखला देण्यासंदर्भात ठराव झाला तो ५ विरुद्ध ४ पंचसदस्यांच्या मतांनी मंजूर झाला आहे. त्यामुळे धारगळमध्ये महोत्सवाचे आयोजन करण्यास परवानगी दिली जाईल, असे सरपंचांनी स्पष्ट केले होते.

परवान्याची प्रत सादर करावी!

परवानगीची प्रत मागूनही ती पंचायत देत नाही. हा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आलेल्या दबावाखाली घेण्यात आला आहे. त्यामुळे खंडपीठाने पंचायतीला परवान्याची प्रत सादर करण्याचे निर्देश द्यावेत तसेच २ डिसेंबरला परवाना देण्याचा झालेला निर्णय रद्दबातल ठरवण्यात यावा, अशी विनंती याचिकादाराने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT