vinod shirodkar Dainik Gomantak
गोवा

Margao Municipal Council: न्यू मार्केटमधील व्यापाऱ्यांची नगरसेवकांकडून सतावणूक

विनोद शिरोडकर : फेस्तफेरीमुळे व्यापाऱ्यांना नुकसान

दैनिक गोमन्तक डिजिटल

न्यू मार्केटमधील व्यापाऱ्यांची दोन नगरसेवकांकडून सतावणूक होत असल्याचा आरोप मडगाव न्यू मार्केट ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शिरोडकर यांनी पत्रकारांकडे आज केला.

पावसाळा सुरू होण्याआधी मार्केटमध्ये गिऱ्हाइकांची गर्दी असते. त्यामुळे रात्री दहा वाजता दुकाने बंद करता येत नाहीत. त्यासाठी आम्ही आणखी एक तास वाढवून द्यावा, अशी मागणी नगराध्यक्षाकडे केली होती. मात्र चार दिवस झाले, तरी मागणी मान्य होत नसल्याचे पाहून आम्ही आमदार दिगंबर कामत यांच्याकडे आमची कैफियत मांडली.

कामत यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याकडे बोलून एक तास वाढवूनही दिला. मात्र उपनगराध्यक्ष व मार्केट समितीच्या अध्यक्ष दिपाली सावळ रात्री दहा वाजता वॉचमनला फोन करून दुकाने बंद करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणत असल्याचे त्याने सांगितले. मार्केट समितीचे सदस्य व नगरसेवक महेश आमोणकर हे सुद्धा अधूनमधून मधून व्यापाऱ्यांना सतावतात असेही त्यांनी सांगितले. मात्र त्यामागे त्यांचा नेमका हेतू काय? हे कळत नाही, असेही शिरोडकर म्हणाले.

फेस्तफेरीमुळे सुद्धा आम्हांला पुष्कळ नुकसान सोसावे लागत आहे. पूर्वी तीन दिवसांची, नंतर आठ दिवसांची व आता तर १५ दिवसांची फेस्तफेरी झाली आहे. यंदा पावसाळ्यापूर्वी फेस्तफेरी झाल्याने लोकांनी फेस्तफेरीत जाऊन वस्तू खरेदी केल्या. त्यामुळे आमचे गिऱ्हाईक कमी झाले. यापूर्वी दिगंबर कामत, दामू नाईक किंवा विजय सरदेसाई यांनी व्यापाऱ्यांना कधीच सतावले, दुखावले नाही. मात्र हे नगरसवेक आम्हांला त्रास करू लागले आहेत. असेही शिरोडकर यांनी सांगितले.

सहकार्याची अपेक्षा

मार्केट समितीचा सदस्य या नात्याने मार्केटमध्ये जी बेकायदेशीर कृत्ये चालू असतात, त्याला विरोध करणे, ही आमची जबाबदारी व कर्तव्य असल्याचे नगरसेवक महेश आमोणकर यांनी पत्रकारांना सांगितले. व्यापाऱ्यांना वेळ वाढवून देणे, हे आमच्या हातात नसते. हा निर्णय मुख्याधिकाऱ्याने घ्यावयाचा असतो.

मात्र मडगाव नगरपालिकेतील मुख्याधिकारी बदलत असतात. मडगावातील फेस्त फेरीला शिरोडकर यांनी दोष देऊ नये. मडगावमध्ये सदैव फूटपाथवर फेस्तफेरी भरलेली असते. पावसाळ्यात गरजेच्या चप्पला, छत्र्या, रेनकोट या स्वस्तात फूटपाथवर उपलब्ध आहेत. त्यामुळे मार्केटमधील व्यापाऱ्यांचे नुकसान होत असेल तर फूटपाथवरील फेस्तफेरी हटविण्यासाठी मडगाव न्यू मार्केट ट्रेडर्स असोसिएशनाचे अध्यक्ष विनोद शिरोडकर यांनी सहकार्य करावे, असेही महेश आमोणकर यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT