Divar Island to Panaji Ferry Boat Service Dainik Gomantak
गोवा

Divar Panaji Ferry: दिवाडी-पणजी फेरीबोटीचा प्रयोग पहिल्याच दिवशी फेल; दिवसभरात फक्त एकाच महिलेचा प्रवास

Ferry Boat Service From Divar Island to Panaji: दिवाडी ते पणजी या जलमार्गावर फेरीबोटीचा वापर करण्याचा नदी परिवहन खात्याचा प्रयोग पहिल्या दिवशी फारसा यशस्वी झाला नाही. आज खात्याने चार फेरीबोटीही तैनात केल्या, पण दिवसभरात एकाच महिलेने दिवाड ते पणजी असा प्रवास केल्याने हा प्रयोग फसणार असल्याचे स्पष्ट आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Ferry Boat Service From Divar Island to Panaji One Women Travelled

पणजी: जुने गोवे येथील शवप्रदर्शन सोहळ्यामुळे जुने गोवे ते पणजी मार्गावर वाहनांच्या रांगा लागतात, त्यामुळे दिवाडी ते पणजी या जलमार्गावर फेरीबोटीचा वापर करण्याचा नदी परिवहन खात्याचा प्रयोग पहिल्या दिवशी फारसा यशस्वी झाला नाही. आज खात्याने चार फेरीबोटीही तैनात केल्या, पण दिवसभरात एकाच महिलेने दिवाड ते पणजी असा प्रवास केल्याने हा प्रयोग फसणार असल्याचे स्पष्ट आहे.

दिवाडी ते पणजी हा जलमार्गाचा प्रवास करायचा झाल्यास दीड तासांचा कालावधी लागतो. जुने गोवा येथील शवदर्शन सोहळ्यामुळे दिवाडी ते जुने गोवा या फेरीबोटीद्वारे जायचे झाल्यास पुढे वाहनांची गर्दीचा त्रास लोकांना सहन करावा लागेल, असे काही अधिकाऱ्यांना वाटले. त्यामुळे दिवाडी ते पणजी ही थेट फेरीबोट सेवा सुरू करण्याचा घाट घातला आणि नदी परिवहन खात्याच्या मंत्र्यांनी त्यास मंजुरीही दिली.

पहाटेपासून फेरीबोटी!

मंत्र्यांनी मंजुरी दिल्यानंतर या मार्गावर प्रयोग म्हणून चार फेरीबोटी ठेवून पाहूया असे ठरले, त्यानुसार कालपासून शिरोडा, कुंभारजुवे, दुर्भाट आणि वळवई-मायणा येथील चार फेरीबोटी नदी परिवहन खात्याने आणून या जलमार्गावर तैनात केल्या. परंतु मंगळवारी पहाटेपासून फेरीबोटी तैनात होत्या.

परंतु पणजीला येणाऱ्या फेरीबोटीत सकाळी सात वाजता एकाच महिला प्रवाशाने प्रवेश केला. त्यानंतर एकही फेरीबोट त्या जागेवरून हलली नाही. सायंकाळी कुंभारजुवे येथील नागरिकांनी फेरीबोटीची मागणी केल्यानंतर एक फेरीबोट त्याठिकाणी पाठविण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT