New Exam Pattern Dainik Gomantak
गोवा

Margao News : नववीसाठी नवीन परीक्षा पद्धत; १० विषय २ सत्रांमध्ये परीक्षा

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News :

मडगाव, इयत्ता नववीसाठी नव्‍या शैक्षणिक धोरणाच्‍या अंमलबजावणीवर अखेर शिक्‍कामोर्तब झाले आहे. शिक्षण खात्‍याने शुक्रवारी तसे परिपत्रक काढले आहे. यंदापासून इयत्ता नववीसाठी दोन्‍ही सत्र परीक्षा ह्या दोन समांतर भागांत विभागल्‍या जातील. तसेच विद्यार्थ्यांना एकूण १० विषय शिकावे लागणार आहेत.

शिक्षण खात्‍याने परिपत्रकाद्वारे अनेक मुद्दे स्‍पष्‍ट केले आहेत. ज्‍यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांना दिशा मिळणार आहे. नुकतीच शिक्षकांसोबत बैठक झाल्‍यानंतर परिपत्रकाद्वारे उरल्‍यासुरल्‍या शंकाही दूर करण्‍यात आल्‍या आहेत. नवीन शिक्षण पद्धत ही शिक्षक, पालक व शाळा व्यवस्थापनापर्यंत पोहचविण्यासाठी शिक्षण खात्याने प्रत्येक तालुक्यात खास कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.

त्यात पालक प्रतिनिधी, शिक्षक प्रतिनिधी, व्यवस्थापन प्रतिनिधी व शाळा प्रमुखांना आमंत्रित केले आहे. नवीन शिक्षण पद्धतीबद्दल शाळा प्रमुख व शिक्षकांना मार्गदर्शन केले जात आहे. चार जूनपासून नववी इयत्तेला नवीन शिक्षण पद्धत अमलात आणण्यास यंत्रणा सज्ज झाली आहे.

प्रथम सत्र परीक्षा ८० गुणांची असेल. त्‍यात चाळीस गुण बहुपर्यायी (एमसीक्यू) प्रश्नांसाठी असतील, तर चाळीस गुण दीर्घोत्तरी प्रश्नांवर आधारित देण्‍यात येतील. त्याशिवाय प्रत्येक सत्रात वीस गुण आंतरिक मूल्यांकनासाठी असणार आहेत.

बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेचे चाळीस प्रश्न सोडवण्यास एक तासाचा अवधी, तर दीर्घोत्तरी प्रश्नांसाठी दोन तासांचा वेळ परीक्षेला दिला जाणार आहे.

परीक्षेत कॉपी रोखण्‍यासाठी प्रश्न पत्रिकेचा खास कोड असणार आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला एकच प्रश्नपत्रिका असणार नाही. विद्यार्थ्याला परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी एकूण दोनशे गुणांपैकी ६६ गुण घ्यावे लागणार आहेत.

१आंतरिक मूल्यांकन पद्धतीत विद्यार्थ्यांच्या सकारात्मक विचार श्रेणीचे मूल्यांकन केले जाणार आहे. आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे इतिहास व भूगोल हे वेगळे विषय म्हणून शिकविले जाणार नाहीत.

२त्‍याच्‍या समन्‍वयातून समाज शास्त्र हा विषय मुलांना शिकावा लागणार आहे. गणित, विज्ञान, समाज शास्त्र व भाषा विषयांव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना यंदापासून पर्यावरण, आर्थिक साक्षरता, रस्ता सुरक्षा, मतदान साक्षरता विषय शिकविले जाणार आहेत.

३ व्यावसायिक विषय व कला विषय हे मुख्य विषय म्हणून शिकविले जाणार आहेत. मुलांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ‘लर्निंग आऊटकम्स’ बघून प्रश्नपत्रिका तयार कराव्या लागणार आहेत.

भाषा : समान वेळ, समान गुण

नव्या शिक्षण पद्धतीत आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे, आता पूर्वीप्रमाणे प्रथम भाषा, दुसरी भाषा व तिसरी भाषा असा फरक असणार नाही. दहावीपर्यंत विद्यार्थ्याला तीन भाषा शिकाव्या लागणार आहेत. आर१ : इंग्रजी भाषा, आर२ : हिंदी, मराठी, कोकणी यापैकी एक भाषा, तर आर३ : कोणतीही एक देशी भाषा शिकण्याची मोकळीक विद्यार्थ्यांना असणार आहे.

यात महत्त्वाचा बदल म्हणजे नव्या पद्धतीत फ्रेंच, पोर्तुगीज किंवा जर्मन व जपानी या भाषांना स्थान असणार नाही. तीनही भाषांना समान महत्त्व असणार असून सगळ्या भाषा विषयाला समान वेळ व समान गुण असणार आहेत.

१२०० तास :

यंदापासून इयत्ता नववीला क्रेडिट पद्धत अमलात आणली जात आहे. प्रत्येक विषयाला ठराविक क्रेडिट दिले असून एका वर्षात दहा विषय शिकण्यासाठी विद्यार्थ्याला बाराशे तास शाळेत खर्च करावे लागणार आहेत.

साडेपाच तास : शाळेच्या वेळेत थोडा बदल अपेक्षित आहे. प्रत्येक दिवशी मध्यांतर, रेमेडीयल सकाळची असेम्ब्ली सोडून साडे पाच तास फक्त शिकवणी होणे गरजेचे आहे.

पूर्णवेळ शाळा : त्यासाठी नववीला आठवड्यातून दोनवेळा पूर्ण वेळ शाळा असणार आहे. काही शाळांनी पाच दिवस पूर्ण वेळ शाळेचा पर्याय निवडला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

SCROLL FOR NEXT