Egg New Rate Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : ‘अंडी’ खाताहेत जाणून घ्या नवीन भाव ? बेळगावातून अंड्यांची आयात

मासळीसह अंडी महाग झाल्याने सध्या तरी सामान्य खवय्यांना जिभेला लगाम घालावा लागत आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News: डिचोली चतुर्थीनंतर मासळी पाठोपाठ आता ‘अंडी’ही महाग झाली आहेत. मासेमारी बंदी काळात महाग झालेली अंड्यांचे दर अजूनतरी पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट अधूनमधून बॉयलर अंड्यांचा भाव वाढत आहे.

गावडी अंडीही २५० रुपये डझन दराने विक्री सुरू आहे.मासळीसह अंडी महाग झाल्याने सध्या तरी सामान्य खवय्यांना जिभेला लगाम घालावा लागत आहे. गेल्या जून महिन्यापासून बॉयलर अंड्यांच्या घाऊक दरात वाढ झाली आहे.

त्यावेळी शंभर अंड्यांमागे ५८५ रुपये अशी वाढ झाली होती. मध्यंतरी श्रावण महिन्यात काही दिवस ‘अंडी’ काही प्रमाणात स्वस्त झाली होती. मात्र श्रावण महिना संपताच ‘अंड्यां’चा पुन्हा भाव वाढला आहे.

आणखी काही दिवस तरी अंड्यांचे दर चढेच राहणार आहेत, असे संकेत विक्रेत्यांकडून मिळाले आहेत.डिचोली बाजारात बॉयलर अंडी उपलब्ध असून बेळगाव परिसरातून अंडी आयात केली जातात.

अजून तरी डिचोलीत बॉयलर अंड्यांची आवक समाधानकारक असली, तरी दर मात्र चढेच आहे.सध्या शंभर नगामागे ५५० रुपये असे अंड्यांचे दर झाले आहेत. सध्या ७५ ते ८० रुपये डझन याप्रमाणे अंड्यांची विक्री होत आहे.

गावठी अंडीही महाग

दुसऱ्या बाजूने तुटवड्यामुळे गावठी अंडीही महाग झाली आहेत. डिचोली बाजारात क्वचितच गावठी अंडी विक्रीस उपलब्ध होत आहेत.

सध्या २५० रुपये डझन याप्रमाणे गावठी अंडी विकण्यात येत आहेत. गावठी अंडी आणखी महाग होण्याचेही संकेत मिळत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT