OMVIR SINGH BISHNOI Dainik Gomantak
गोवा

Goa Police: एक जुलैपासून नवीन फौजदारी कायदा, आता खटल्‍यांचा निकाल वेळेत लागणार

Goa Police: नवीन फौजदारी कायदा : इलेक्‍ट्रॉनिक्‍स पुरावे ग्राह्य धरले जातील : बिश्‍‍नोई

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Police

एक जुलैपासून लागू होणाऱ्या नवीन फौजदारी कायद्याच्या माध्यमातून ‘विकसित भारत’ ही विचारधारा यशस्वी करण्यासाठी या कायद्यातील बदल नागरिकांना स्वीकारावे लागणार आहेत.

कमी कालावधीत खटल्‍यांचा निकाल, देशातून पळून गेलेल्‍या गुन्‍हेगारांवर कारवाई आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स पुरावे ग्राह्य धरणे ही काही प्रमुख वैशिष्‍ट्ये आहेत, असे असे पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्‍‍नोई यांनी सांगितले.

येथील इस्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संस्‍थेच्‍या सभागृहात आयोजित ‘नवीन फौजदारी कायदे : 2023 ’वरील कार्यशाळेत बिश्‍‍नोई गोव्यातील पत्रकारांना संबोधित करत होते.

ते म्‍हणाले, नागरिकांना काही बदल स्‍वीकारावे लागतील, ज्यामध्ये न्यायालयीन खटल्यांत गुन्हे नोंदविण्यासाठी डिजिटलायझेशन आणि तंत्रज्ञानाचा समावेश केला जाईल. हे केवळ कायदे नाहीत तर ते गुन्हे कमी करणे व लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी नवीन आयाम उघडतील.

जागृतीसाठी प्रसारमाध्‍यमांची भूमिका महत्त्‍वपूर्ण

ब्रिटिश कायदे गुन्हेगाराला शिक्षा करण्यासाठी आणि त्यावेळच्या गुन्ह्यांचा विचार करून बनविले गेले होते. परंतु नवे फौजदारी कायदे केवळ शिक्षा देण्यासाठी नाही तर लोकांना जलद न्याय देण्यासाठी तयार केले आहेत.

या कायद्याबद्दल नागरिकांमध्‍ये जागृती करण्‍यास प्रसारमाध्यमे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, असे पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्‍‍नोई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अर्ध्या तासाच्या पावसानं मालपेतील रस्त्यांना ओहळाचे स्वरूप; वाहनचालकांचा खोळंबा; निचरा व्यवस्था नसल्याने समस्या

मुसळधार पावसाचा तडाखा! आके येथील गृहनिर्माण वसाहतीची संरक्षक भिंत कोसळली; परिसरात भीतीचं वातावरण

NSUI Law Students: 'कायदा'च्या विद्यार्थ्यांना न्याय द्या! 'एनएसयूआय'ची मागणी; कुलगुरूंकडून तोडगा काढण्याचे आश्‍वासन

Goa Tourist Safety: अभयारण्यातील धबधब्यांचे पर्यटकांना आकर्षण; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल, दंडासह अटकेचीही शक्यता

California Shooting: कॅलिफोर्नियात फिफा वर्ल्ड कप फॅन झोनजवळ गोळीबार! एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT