Electric Bus  Dainik Gomantak
गोवा

Electric Bus: इलेक्ट्रिक बसेससाठी नवीन बसथांबे

Electric Bus: जुने थांबे हटविले : आता 36 ठिकाणी उभारणार नवीन, आकर्षक बसथांबे

दैनिक गोमन्तक

विलास ओहाळ

इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडच्या वतीने (आयपीएससीडीएल) पणजी शहरात स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत दहा ठिकाणी शहर बसेससाठी नवीन बसथांबे उभारले होते. परंतु त्यांचा लूक पंसतीस उतरला नसल्याने आता नव्याने त्यांची रचना करण्यात आली आहे.

नव्याने रचना केलेले बसथांबे सध्या कला अकादमीजवळ उभारले आहे. या धर्तीवर आता ३६ ठिकाणी बसथांबे दिसणार आहेत. पणजीतील स्मार्ट सिटीची कामे जून २०२४ पर्यंत संपविण्यात येतील, असे आयपीएससीडीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजित रॉड्रिग्स यांनी पणजीचे आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांना आश्‍वस्त केले आहे. त्यामुळे रॉड्रिग्स यांच्या मते पणजीतील रस्ते स्मार्ट होतील. शिवाय अंतर्गत बससेवा सुरू होईल, अशी आशा संबंधितांना वाटते.

कदंब परिवहन महामंडळाने नुकतीच अधिसूचना जारी करून शहरात किमान ६० इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याविषयी काही आक्षेप असतील तर ते नागरिकांना नोंदविण्यासाठी मुदत दिली आहे.

परंतु इलेक्ट्रिक बसेस पणजीतील रस्त्यावर धावण्यासाठी आयपीएससीडीएल प्रयत्नशील आहे. यात मोठ्या इलेक्ट्रिक बसेस, मिनी इलेक्ट्रिक बसेस आणि बग्गीसारखी सेवा सुरू करण्याचा कदंबचा विचार आहे. आल्तिनो, मळा, अशा ठिकाणी जाण्यासाठी बग्गीचा उपयोग होण्याची शक्यता आहे.

‘ते’ बसथांबे उतरले नाहीत पसंतीस

बससेवा सुरू होणार म्हटल्यावर शहर बसस्थानकाचा लूक साजेसा दिसायला हवा. काही महिन्यांपूर्वी शहरातील दहा ठिकाणी बसथांबे उभे केले होते, परंतु ती रचना पसंतीस उतरली नसल्याने आयपीएससीडीएलने आता दुसरी रचना संबंधित कंत्राटदाराकडून करून घेतली आहे. कंत्राटदाराने कला अकादमी येथे नवी रचनेतील बसथांबे उभारले असून, ती रचना पसंतीस उतरली आहे. मंगळवारपर्यंत शहरातील उभारलेले सांगाडे काढून टाकण्याचे काम सुरू होते. आता नव्याने 36 ठिकाणी पसंतीस उतरलेल्या रचनेतील बसथांबे दिसणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT