Juvem Bridge, Nilkanth Halarnkar Dainik Gomantak
गोवा

Juvem Bridge: ‘राण्यांचे जुवें’ बेटावर होणार नवा पूल! पादचारी पुलाची डागडुजी 2 दिवसांत

Nilkanth Halarnkar: एप्रिल २०२५ मध्ये तांत्रिक मंजुरी दिली आहे. लवकरच माती परीक्षणाला प्रारंभ होईल, अशी माहिती थिवीचे आमदार तथा मत्स्योद्योग मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी दिली.

Sameer Panditrao

म्हापसा: नादोडा पंचायत क्षेत्रातील ‘राण्यांचे जुवें’ बेटावर लवकरच नवीन पूल बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी माती परीक्षणाला एप्रिल २०२५ मध्ये तांत्रिक मंजुरी दिली आहे. लवकरच माती परीक्षणाला प्रारंभ होईल, अशी माहिती थिवीचे आमदार तथा मत्स्योद्योग मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी दिली.

विद्यमान पादचारी पुलाच्या डागडुजीचे काम येत्या दोन दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर पूल वाहनांसाठी खुला करावा की नाही, यावर लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ, असे मंत्री हळर्णकर म्हणाले.

‘राण्यांचे जुवें’ येथील पादचारी पुलाला आज आमदार हळर्णकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते विन्सेंट डिसोझा, संदीप कारखानीस, नादोडाच्या सरपंच विश्वजा हळदणकर, अ‍ॅड. महेश राणे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

मंत्री हळर्णकर म्हणाले की, जुवे येथील पादचारी पुलाच्या डागडुजीचे काम अंतिम टप्प्यात पोचले आहे. तसेच याठिकाणी नवीन पुलासाठीचे सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण करून लवकरच पूल उभारला जाईल. सध्या नवीन पुलासाठी माती परीक्षणाला तांत्रिक मंजुरी दिली आहे. या कामाला १८.४९ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

जुवे येथील पादचारी पूल कमकुवत झाल्याने मागील सहा महिन्यांपासून यावरून वाहनांना जाण्यास निर्बंध घातले आहेत. सध्या या पुलाच्या डागडुजीचे काम सुरू आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

माझे काम लोकहितासाठी

जुवे पुलाविषयी सध्या काहीजणांकडून राजकीय आरोप होत आहेत. त्याविषयी विचारले असता मंत्री हळर्णकर म्हणाले, की मी लोकांसाठी काम करतो.

नवीन पूल बांधणीसाठी शासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे. जे पुलाविषयी आरोप करत आहेत, ती त्यांची बोलण्याची शैली असावी.

अनेकांना निवडणुकीची खुमखुमी

आगामी काळात, जिल्हा परिषद आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे अनेकजण निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. तसेच आम्ही कोणाच्या बोलण्यावर निर्बंध लादू शकत नाही. ज्यांना बोलायचे आहे, त्यांनी खुशाल बोलावे. जुवे बेटावर मी अनेक विकासकामांना चालना दिली आहे, असा पुनरुच्चारही मंत्री हळर्णकर यांनी यावेळी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT