New Borim Bridge  Dainik Gomantak
गोवा

New Borim Bridge: नवीन बोरी पुलासाठी 1000 कोटींचा आराखडा! अडीच वर्षांत काम होणार पूर्ण; ढवळीतून निघणार बगलरस्ता

New Borim Bridge News: बराच काळ रेंगाळलेल्या बोरी पुलाच्या कामासाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: बराच काळ रेंगाळलेल्या बोरी पुलाच्या कामासाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यासंबंधीच्या निविदा जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता दत्तप्रसाद कामत यांनी दिली.

निविदा दिल्यानंतर अडीच वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले असल्याचे दत्तप्रसाद कामत म्हणाले. फोंड्यासाठी आणि एकंदर राज्याच्या दळणवळणासाठी महत्त्वाचा ठरलेला बोरी पूल कमकुवत झाला असून या पुलावरून वाहतूक करणे धोकादायक ठरले आहे. त्यामुळे नवीन पुलाची योजना मार्गी लागली आहे.

पाच वर्षे टिकणार पूल!

बोरीचा पूल भक्कम असून आणखी पाच वर्षे टिकणार असल्याचे उदगार वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काढले. वास्तविक कँटिलिव्हर पद्धतीने उभारलेल्या पुलांच्या जागी नवीन पद्धतीने पूल बांधण्याची योजना आहे. त्यामुळे अशा पद्धतीने उभारलेले पूल अधिक मजबूत होतात. सध्या बोरी पुलाची तज्ज्ञांमार्फत तपासणी केली आहे. त्यामुळे आणखी किमान पाच वर्षे हा पूल सुरक्षित राहील, असे वीजमंत्री ढवळीकर म्हणाले.

बोरीतून बगल रस्ता...!

बोरीत कायम वाहतूक कोंडी होत असल्याने ढवळी येथून बोरी पुलासाठी बगल रस्ता काढण्यात येणार आहे. साईबाबा मंदिरासमोरील जमिनीतून हा रस्ता नेऊन नवीन बोरी पुलाला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी कायम मिटणार असून वाहतूकही सुरळीत होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT