Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

Netravali: कदंबच्या 'त्या' कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करणार : वनमंत्री राणे

Vishwajit Rane: वन खात्याकडून आम्हाला कारवाईबाबत अजून कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॅरेक नेटो यांनी स्पष्ट केले.

Manish Jadhav

Netravali Wildlife: नेत्रावळी अभयारण्यातील साळजिणी येथे शिकारीच्या संशयावरुन वन खात्याने अटक केलेल्या कदंब महामंडळाच्या सोळाही कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे आपण निर्देश दिल्याचे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे, हा गुन्हा खासगी स्वरूपाचा आहे. त्यामुळे महामंडळामार्फत त्यांच्यावर तत्काळ कारवाई करता येणार नाही. वन खात्याकडून आम्हाला कारवाईबाबत अजून कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॅरेक नेटो यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या कर्मचाऱ्यांना (Employees) न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या सोळाही जणांना पुढील पाच दिवस चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

साळजिणी येथे शिकार करून पार्टी करण्यासाठी गेल्याच्या संशयावरून वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी कदंब महामंडळाच्या सांगे भागातील चालक, वाहक अशा मिळून सोळा कदंब कर्मचाऱ्यांना शनिवारी रात्री ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पाच काडतुसांसह कोयते, कुऱ्हाड आणि जेवण बनवण्यासाठी लागणारे टोप, ताट आदी साहित्यही जप्त करण्यात आले.

ताब्यात घेतल्यानंतर रात्री उशिरा या सर्वांना नेत्रावळी वन्यजीव विभागाच्या कार्यालयात आणून त्यांच्याविरोधात वन्यजीव रक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच सर्वांना अटक करण्यात आली. सोमवारी त्यांना न्यायालयाने (Court) जामीन मंजूर करत पुढील पाच दिवस चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

SCROLL FOR NEXT