Goa Beaches Sand Erosion Dainik Gomantak
गोवा

Goa Beaches: गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांच्या मदतीला नेदरलँडचे 'सँड मोटर तंत्रज्ञान', कसा होणार फायदा?

समुद्रकिनारे संरक्षणासाठी गोवा कोस्टल मॅनेजमेंट एन्व्हायर्नमेंट सोसायटीने या तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे.

Pramod Yadav

गोव्यातील समुद्रकिनारी असणारी वाळू सातत्यानं कमी होत असल्यामुळं गोव्यातील किनाऱ्यांचा ऱ्हास होत आहे. धूप झाल्यामुळे किनाऱ्यावरील वाळू समुद्राच्या प्रवाहात वाहून जात आहे. NIOT च्या 2021 मध्ये आलेल्या या अहवालातून चिंताजनक माहिती समोर आली आहे. राज्यातील किनाऱ्यांची धूप रोखण्यासाठी 'सँड मोटर तंत्रज्ञाना'चा वापर केला जाणार आहे.

समुद्रकिनारे संरक्षणासाठी गोवा कोस्टल मॅनेजमेंट एन्व्हायर्नमेंट सोसायटीने या तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे.

नेदरलँड-आधारित एजन्सीच्या तज्ञ शास्त्रज्ञांना प्राथमिक अभ्यासासाठी गोव्यात येण्याचे आमंत्रण दिले आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (NIO) आणि नॅशनल सेंटर फॉर कोस्टल रिसर्च (NCCR) यांच्या तांत्रिक सहाय्याने हा अभ्यास आणि काम केले जात आहे. अशी माहिती पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री नीलेश काब्राल यांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर दिले.

समुद्र पाणी पातळीच्या वाढीच्या प्रभावापासून सखल किनारपट्टीच्या झोनचे संरक्षण करणे हा या नाविन्यपूर्ण सँड मोटर तंत्रज्ञानाचा उद्देश आहे. मोठ्या वाळू उत्खनन करून ती किनारपट्टीवर जमा केली जाते. जमा झालेली वाळू समुद्राच्या पातळीत वाढ होण्याविरुद्ध बफर म्हणून काम करते.

राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची सर्वाधिक धूप होत असल्याची माहिती अहवालातून समोर आली होती. यात पेडणे तालुक्यातील केरी, बार्देशमधील कोको, सासष्टीतील माजोर्डा आणि मोबोर ते बेतुल दरम्यानचा भाग, बेतालभाटी आणि केपे तालुक्यातील खणगिणी या किनाऱ्यांचा समावेश आहे.

गोवा कोस्टल मॅनेजमेंट एनवायरमेंट सोसायटीनं या किनाऱ्यांची बचावासाठी एक अभियान सुरु केलं आहे. यासाठी नेदरलँडच्या 'सँड मोटर तंत्रज्ञाना'चा वापर केला जाl आहे. अशी माहिती निलेश काब्राल यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT