डिचोली परिसरात केबलसाठी चर खोदताना निष्काळजीपणा Dainik Gomantak
गोवा

केबलसाठी चर खोदताना निष्काळजीपणा; वाहनचालकांची तक्रार

चर खोदताना माती अशी रस्त्यावर धोकादायक अवस्थेत टाकण्यात येत असुन; काही ठिकाणी माती रस्त्यावर टाकण्यात येत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे

दैनिक गोमन्तक

डिचोली: डिचोली-साखळी रस्त्याच्या बाजूने चर खोदताना आवश्यक ती खबरदारी घेण्याच्याबाबतीत निष्काळजीपणा होत असल्याचे आढळून येत आहे. काही ठिकाणी माती रस्त्यावर टाकण्यात येत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. सध्या गोकुळवाडा-सर्वण परिसरात हे प्रकार घडत आहेत. चर खोदला की, दोन-दोन दिवस माती रस्त्यावरच पडलेली दिसून येत असते. (Negligence while digging trenches for cables in Dicholi area)

सध्या वाठादेव येथून (Bicholim) डिचोली-साखळी (Sanqulim) रस्त्याच्या बाजूने दूरसंचार कंपनीकडून केबल टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र केबल टाकण्यासाठी खोदण्यात येणारी चरातील माती टाकताना योग्य ती खबरदारी घेण्यात येत नाही. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत नाही, अशी वाहनचालकांची तक्रार आहे. या मातीमुळे रात्रीच्यावेळी अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. केबलसाठी चर खोदताना संबंधित ठेकेदारांने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे. गोकुळवाडा येथे गोविंदनगर रस्त्याच्या जंक्शनजवळ दोन दिवस माती रस्त्यावरच होती. सोमवारी (ता. २८) ती माती काढण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT