Delilah Lobo  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: शिवोली येथील पाणी टंचाई समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढावा; लोबो यांची मागणी

Delilah Lobo: शिवोली परिसरात प्रतिदिन ६ दशलक्ष लिटर पाण्याची कमतरता; तूट भरून काढण्यासाठी सरकारने व्यवस्था करावी

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: शिवोली मतदारसंघात पाणीपुरवठ्याची समस्या आहे. सध्या या भागात सुमारे ६ दशलक्ष लिटर पाण्याची प्रति दिन कमतरता आहे. पाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू होईपर्यंत ही तूट भरून काढण्यासाठी सरकारने व्यवस्था करावी, अशी मागणी आमदार डिलायला लोबो यांनी आज विधानसभेत केली.

काही निवासी संकुलामध्ये मोटार पंप बसवून पाण्याच्या वाहिनीतील पाणी खेचण्यात प्रकार सुरू आहेत तसेच पाण्याचे व्हॉल्व सोडण्यात हेराफेरी होत असल्याने कमी पुरवठा शिवोली भागाला होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून समस्या सोडवावी, असे लोबो यांनी आज विधानसभेत सार्वजनिक बांधकाम खाते, पोलिस, कारागृह तसेच इतर खात्यांच्या मागण्यांवरील चर्चेवेळी सांगितले.

नवीन मतदारांना त्यांची नावे मतदान यादी समावेश करण्यासाठी निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ खुले नसते. जेव्हा निवडणूक जवळ येते तेव्हाच नवीन मतदारांसाठी नावे समावेश करण्यास ती खुली असते.

यासंदर्भात प्रभागस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याशी संपर्क साधल्यास ती त्याकडे दुर्लक्ष करतात. निदान ज्यांना नावे मतदार यादीत समावेश करायची असतील त्यांचा फॉर्म या बीएलओनी भरून घ्यावा व संकेतस्थळ जेव्हा खुली होईल तेव्हा त्यांना बोलावून त्याची पूर्तता करावी.

इतर राज्यातील पोलिस स्थानिक पोलिसांना कोणतीच माहिती न देता अटक करून नेतात हे बेकायदेशीर आहे. जरी कोणी कोणत्या गुन्ह्यात गुंतला आहे त्याची माहिती देणे आवश्‍यक आहे मात्र हल्लीच हैद्राबाद पोलिसांनी गोव्यातील युवकांना कोणतीही माहिती गोवा पोलिसांना न देता अटक करून नेले होते. त्यामुळे हैद्राबाद पोलिसांना अशा प्रकारे हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही, असे लोबो म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cyber Crime: 1.41 कोटींचा गंडा! नागपूरच्या 23 वर्षीय 'मास्टरमाईंड'ला गोवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या; फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली वाळपईच्या एकाला लुटलं

Panchank Rajyog 2026: धनु राशीत मंगल-वरुणचा मिलाफ! 'पंचांक योग' उजळवणार 'या' 3 राशींचं नशीब; 7 जानेवारीपासून सुवर्णकाळ

"उद्या भारतासोबतही असं घडू शकतं..."; निकोलस मादुरोंच्या अपहरण प्रकरणावर काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य; सोशल मीडियावर पेटला वाद VIDEO

Kartik Aaryan: गोव्यातील सुट्ट्या अन् आता स्नॅपचॅट वाद! कार्तिक आर्यनच्या 'त्या' व्हायरल स्क्रीनशॉटने खळबळ; काय नेमकं प्रकरण?

मोपा विमानतळावरील वाहन प्रवेश शुल्कावरून 'GMR'ला शो-कॉज नोटीस; 7 दिवसांत मागितला खुलासा

SCROLL FOR NEXT