Drugs  Dainik Gomantak
गोवा

NCB Raid : कारवाईचा धडाका सुरुच; ब्राझीलमधून गोव्यात आणला जाणारा कोकनचा साठा जप्त

सोनाली फोगट मृत्यू प्रकरणानंतर देशात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून सातत्याने कारवाया केल्या जात आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Drug Case : गोव्यात सध्या अमली पदार्थांच्या तस्करीवरुन वातावरण चांगलंच तापलं असताना आता आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे. ब्राझीलमधून गोव्यात आणला जाणारा मोठा ड्रग्जसाठा मुंबई विमानतळावर जप्त करण्यात आला आहे. एनसीबीने तब्बल 13 कोटींचे 3.20 किलो ब्लॅक कोकेन हस्तगत केले आहे.

सोनाली फोगट मृत्यू प्रकरणानंतर देशात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. आज याच कारवाईत एक बडा मासा एनसीबीच्या गळाला लागला आहे. एनसीबीला मुंबईत मोठं यश मिळालं असून पहिल्यांदाच देशात ब्लॅक कोकेनचा साठा पकडण्यात यश आलं आहे. आज मुंबई विभागाने मोठ्या प्रमाणावर ब्लॅक कोकेन जप्त केलं आहे.

तीन किलोग्रॅम वजनाच्या या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात जवळपास 13 कोटी रुपये इतकी किंमत असल्याचं बोललं जात आहे. एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक अमित गवाते यांच्या माहितीनुसार, ब्लॅक कोकेन पकडणं खूप कठीण असतं. डॉग स्क्वॉडसुद्धा याचा वास ओळखू शकत नसल्यामुळे त्याचा मागमूसही लागत नाही.

दरम्यान आज पकडण्यात आलेलं ब्लॅक कोकेन हे मुंबईतून गोव्यात आणलं जाणार होतं आणि त्यानंतर शेजारील राज्यांमध्ये त्याची तस्करी केली जाणार होती. त्यामुळे ही ड्रग्ज तस्करीविरोधात मोठी कारवाई मानली जात आहे. एनसीबीने ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी एका महिलेला अटक केली आहे, तर तिच्या एका नायजेरियन साथीदाराला गोव्यातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या रॅकेटच्या माध्यमातून गोव्यातून तीन राज्यांमध्ये ड्रग्जची तस्करी व्हायची अशी प्राथमिक माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT